Jalgaon Civil Hospital : जळगाव जिल्हा रुग्णालयात डॉक्टर, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, नर्सिंगसह ६४१ पदांचा ‘बॅकलॉग’ आहे. रुग्णालयातील रुग्ण सेवांचा दर्जा चांगला असल्याने रुग्णांची संख्या रोज वाढत आहे.
असे असताना दुसरीकडे मात्र ८०६ पैकी केवळ १६५ पदे भरली आहेत. ६४१ पदे रिक्त आहेत. याचा रूग्ण सेवेवर परिणाम होत आहे. रुग्णालयात औषधसाठा भरपूर असला, तरी अपूऱ्या मनूष्यबळाअभावी रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. शासनाने रिक्तपदे त्वरीत भरण्याची गरज निर्माण झाली आहे.
नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसारखे रुग्णांच्या मृत्यूंची प्रकरणे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात होऊ नयेत यासाठी प्रशासन काळजी घेत असल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर सांगत असले, तरी रिक्त कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण इतर कर्मचाऱ्यांवर येत आहे.
जिल्हा रुग्णालयात ३७८ खाटा आहेत. रोज तपासणीसाठी येणाऱ्या ‘ओपीडी’तील रुग्णांची संख्या ८०० ते ११०० दरम्यान आहे. तीनशे ते पावणे चारशे रूग्ण दाखल असतात.
मृतदेहांमुळे कोरोना काळ गाजला
जिल्हा रुग्णालया व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना काळात जून २०२० मध्ये कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे भुसावळच्या एका वृद्ध महिलेचा मृतदेह तब्बल सात दिवसांनंतर जिल्हा रुग्णालयातील शौचालयात आढळून आला होता. ही बातमी देशपातळीवर गाजल्याने शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सात डॉक्टरांचे निलंबन आरोग्य विभागाने केले होते.
महिलेच्या मृत्यूचे प्रकरण, कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचीही बदली करण्यात आली. नवीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी रुग्णालयाचा कारभार सुधारला. त्यानंतर आलेले अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी रुग्णालयांचा लुकच बदल टाकला होता.
कोरोना काळात कंत्राटी भरती करून रुग्ण सेवा सुरू होती. कोरोनाची शेवटची लाट संपताच कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र त्याचा रुग्णसेवेवर आता विपरीत परिणाम होत आहे. अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांना कमी मनूष्यबळावर रुग्णालयाचा गाडा चालवावा लागत आहे.
अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांना कमी मनूष्यबळावर रुग्णालयाचा गाडा चालवावा लागत आहे.वर्ग एकमध्ये डॉक्टर, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, तीनमध्ये लिपीक, चारमध्ये शिपायांचा सामावेश आहे. डॉक्टरांची ७ पदे रिक्त आहेत. त्यात क्ष किरण शास्त्र, त्वचारोग शास्त्र, औषध निर्माण शास्त्र, मनोविकृती शास्त्र, दंत शास्त्र, शल्य रोग शास्त्र, कान नाक घसा शास्त्र या डॉक्टरांची पदे रिक्त आहेत.
रुग्णालयातील रिक्त पदे अशी
पदे मंजूर रिक्त
वर्ग एक ५० २५
वर्ग दोन ५० १३
वर्ग ३ २४५ १८०
वर्ग ४ ६१ ३८
नर्सींग ४०० ३८५
एकूण ८०६ ६४१
"नर्सिंगच्या पदांबाबत नुकतीच परीक्षा झाली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या महिन्याभरात रिक्त पदे शासनाच्या सूचनेनूसार भरली जातील." -डॉ. गिरीष ठाकूर, अधिष्ठाता, जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.