जळगाव : बचत गटातील महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सव भरारी फाउंडेशनतर्फे १९ ते २३ जानेवारीदरम्यान सागर पार्क मैदानावर आयोजित केला आहे.
महोत्सवाचे हे आठवे वर्ष आहे. १९ जानेवारीस सायंकाळी साडेपाचला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते सागर पार्कवर महोत्सवाचे उद्घाटन होईल.
कृषी संचालक विकास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, दशरथ तांबोळी, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उद्योगपती रजनीकांत कोठारी, अनिल कांकरिया, बाळासाहेब सूर्यवंशी, किशोर ढाके आदी या वेळी उपस्थित राहतील. (Bahinabai festival in Jalgaon from today Organized by Bharari Foundation in five days enjoyment Jalgaon News)
अडीचशेवर स्टॉल्स
महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंना हक्कांचे व्यासपीठ मिळून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, हा उद्देश आहे. या महोत्सवात जळगावसह खान्देशातील २६० बचत गटांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले.
कार्यक्रमांची रेलचेल
१९ जानेवारीला महिलांसाठी ‘खेळ चारचौघींचा’, ‘जागर पौष्टिक तृणधान्यांचा’, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २० जानेवारीला परिवर्तन संस्था आयोजित ‘अरे संसार संसार’ कवितांची मैफल, महादेव महाराज शेंडे यांचे ‘आल्या पाच गवळणी’ भारुड, २१ जानेवारीस मराठी संस्कृतीचा फॅशन शो, २२ जानेवारीला शाहीर देवानंद माळी यांचा स्वातंत्र्याची शौर्यगाथा पोवाडा असे सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
बहिणाबाई पुरस्कार जाहीर
महोत्सवात देण्यात येणारे बहिणाबाई पुरस्कार राहीबाई पोपरे (नगर), कृषी संचालक विकास पाटील (पुणे), तात्यासाहेब फडतरे (पुणे), श्रीराम पाटील (जळगाव), अंजलीराजे जाधव (नाशिक), सुकन्या पाटील व श्रृती थेपडे (जळगाव), राजेंद्र ठोंबरे (चाळीसगाव), राहुल पाटील (चोपडा), परिवर्तन संस्था (जळगाव) यांना जाहीर करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.