Bail Pola 2022 : Jain Hillsवर पोळ्याचा आनंद झाला द्विगुणित

Jyoti and Ashok Jain worshiping Sarjaraja on the occasion of Polana celebrated at Jain Hills. Along with other members and dignitaries.
Jyoti and Ashok Jain worshiping Sarjaraja on the occasion of Polana celebrated at Jain Hills. Along with other members and dignitaries.esakal
Updated on

जळगाव : संबळचा तालबद्ध सूर.. ऋषभराजाला पांघरलेले झूल.. पायातील घुंगरू गळ्यातील घंट्याचा एक स्वर.. डौलात निघालेली मिरवणूक.. पावरी नृत्य, आदिवासी नृत्य सोंग व घोडा, गुरख्या डेंगा.. हनुमान पार्वती मोर नंदीनृत्याविष्कार.. ढोल बाजाचा गजर.. ऋषभराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक सहकाऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद... जैन हिल्सवरील हे पोळ्याचे दृष्य. (Bail Pola 2022 Bail Pola on Jain Hills Jalgaon Latest marathi news)

जैन कृषी संशोधन केंद्राच्या ध्यानमंदिरापासून मिरवणुकीस सुरवात झाली. भवरलाल जैन यांच्या समाधीस्थळी बैलांच्या मिरवणुकीने प्रदक्षिणा घातली व वंदन केले. त्यानंतर श्रद्धाधाम, सरस्वती पॉईंट मार्ग सवाद्य मिरवणू्क काढण्यात आली होती. मुख्य सोहळा जैन हिल्स हेली पॅड येथील मैदानावर झाला.

यावेळी व्यासपीठावर अणूशास्त्रज्ञ व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, महात्मा गांधीजींचे पणतू श्री. तुषार गांधी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, श्री. राजा मयूर, डॉ. सुभाष चौधरी, डॉ. सुदर्शन अय्यंगार, डॉ. एम. पी. मथाई यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्य व शहरातील मान्यवर उपस्थित होते.

अशोक जैन यांनी पोळा फोडण्याच्या सोहळ्यासाठी हिरवी झेंडी दाखविली. सालदार अविनाश गोपाल यांनी पोळा फोडण्याचा मान मिळविला. ज्योती जैन यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्यांनी बैलांचे विधीवत पूजन करून त्यांना गोड घास भरविला.

जैन परिवारातील सर्वात लहान सदस्य अर्थम अथांग जैन यांच्या हस्ते सुद्धा घास भरविण्यात आला. भव्य अशा व्यासपीठावर सप्तधान्याची रास, शेती उपयोगी अवजारांचे पूजन अशोक जैन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.

Jyoti and Ashok Jain worshiping Sarjaraja on the occasion of Polana celebrated at Jain Hills. Along with other members and dignitaries.
मंदीची चाहुल : बांधकामाशी संबंधित सव्वाशे व्यवसाय संकटात

भूमिपुत्रांचा सत्कार

जैन कृषी संशोधन विकास केंद्रातील विविध ठिकाणांवर २५ च्यावर बैल जोड्या आहेत. त्यांच्यासाठी ३५वर सालदार गडी शेती-मातीत राबत असतात. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व जैन परिवाराच्या हस्ते सर्व सालदारांचा परिवारासह सत्कार व संसारोपयोगी साहित्य भेट सन्मानाने देऊन गौरव करण्यात आला.

"भारतीय संस्कृती, कृषी सांस्कृतिक वैभवाचा जैन हिल्स परिसरात मला अनुभव आला. प्रत्यक्ष सहभाग घेता आल्याने मी स्वत: ला भाग्यवान समजतो.."

- डॅनियल हदाद

Jyoti and Ashok Jain worshiping Sarjaraja on the occasion of Polana celebrated at Jain Hills. Along with other members and dignitaries.
Nashik : रेल्वेकडून कलेक्टरांच्या पत्राला टोपली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.