जळगाव : बालगंधर्व संगीत महोत्सवात आजच्या दिवसाची संध्याकाळ रम्य झाली रसिक स्वरोत्सवात न्हाऊन निघाले. निमित्त होते ज्येष्ठ गायक पंडीत डॉ. राम देशपांडे व त्यांच्या सौभाग्यवती अर्चना देशपांडे, मुलगा गंधार देशपांडे यांच्या सहगायनाचे.पंडीत डॉ. राम देशपांडेंनी गायनाची सुरवात राग यमन कल्याणने केली.
ताल तीलवाड्यात बंडा ख्याल ‘जिया मानत नाही’ व द्रुत ख्याल तिनतालात ‘ननदिके बचनुवा संह न जाये’ अत्यंत दमदारपणे सादर केले. त्यानंतर पंडितजीचा स्वरचित तराणा ‘देनी देनी देनी तनन’ हा एकतालातील सादरीकरणाने रसिकांची वाहवा मिळविली.
त्यानंतर पंडिता किशोरीताई अमोणकर यांनी गाऊन अजरामर केलेल्या " बोलावं विठ्ठल, पहावा विठ्ठल" या अभंगला स्वतःची राग भिन्न षड्ज रागात बांधलेल्या चालीचा तोच अभंग सादर करून वातावरण भक्तिमय केले. (Bal Gandharva Music Festival End Yesterday Audience Enjoying Last Music Night Jalgaon News)
पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत असलेले आणि अजरामर झालेले सं. कट्यार काळजात घुसली या नाटकातील रागमालेवर आधारित "सूरत पिया बिन छिन बिसराये" हे पद सादर करून रसिकांना तृप्त केले. पंडितजींनी आपल्या मैफिलीची सांगता कोण जागता कोण सोता या भजनाने झाला.
पं. कुमार गंधर्व यांची गाऊन अजरामर केलेल्या "सावरे ऐजैयो, जमुना किनारे मोरा गाव" या गीताने केली. आणि रसिकांच्या कानात हे सूर घुमत राहिले. त्यांना साथ संगत तबल्यावर रामकृष्ण करंबळेकर, संवादिनीवर अभिनय रवंदे, तानपु-यावर मयूर पाटील, वरूण नेवे यांनी केली.
मोहन वीणा, सात्विक वीणा यांची जुगलबंदी
बालगंधर्व संगीत महोत्सतील व्दितीय समारोपाच्या सत्रात पद्मभुषण व कॕनिडीयन ग्रॕमी ॲवार्ड विजेते पिता पुत्र पं. विश्वमोहन भट व पं. सलिल भट यांच्या मोहन वीणा व सात्विक वीणा यांच्या जुगलबंदीने झाले. सुरूवातीला पंडीतजींनी स्वरचित विश्वरंजनी रागामध्ये आलाप, जोड , झाला, विलंबीत तिन तालात व मध्य व द्रुत लय तिन तालात सादर करून रसिकांना एका वेगळ्या रागाची अनुभूती रसिकांना दिली.
१९९० दशकात अमेरिकेमध्ये पंडीतजींनी एका अल्बमची निर्मिती केली त्यामध्ये असलेली रचना "अ मिटींग बाय द रिव्हर" या रचनेसाठी ग्रॅमी ॲवार्ड दिले गेले हा ग्रॅमी ॲवार्ड सर्वप्रथम भारतात आणण्याचा मान पं. विश्वमोहन भट यांना मिळाला. त्याचसोबत राग जोग मधील एक उत्कृष्ट रचना सादर केली. ही रचनासुध्दा ग्रॕमी ॲवार्डमध्ये समाविष्ट होती. पंडीतजींच्या मैफिलाचा आणि २१ व्य बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप दोन्हीही कलावंतांनी जुगलबंदीच्या माध्यमातून वंदे मातरम् ने केला. त्यांच्याबरोबर तबल्याची संगत युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे बडोद्याचे हिंमाशू महंत यांनी केले.
रसिक श्रोत्यांचाही झाला गौरव
बालगंधर्व संगीत महोत्सवात या २१ व्या आर्वतनाच्या माध्यमातून ज्या रसिक श्रोत्यांनी ही २१ आवर्तने उपस्थित राहून हा महोत्सव काना- मनात साठवला आहे, अशा रसिकांचे प्रातिनिधीक स्वरूपात पुष्पगुच्छ देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुलकर्णी व विश्वस्त प्रा.शरदचंद्र छापेकर यांच्याहस्ते कृतज्ञता गौरव करण्यात आला. यात इंद्रराव पाटील, दिगंबर महाजन, सुदिप्ता सरकार, मेजर नाना वाणी, देविदास पाटील तसेच मायटी ब्रदर्सच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे मिलींद थत्ते यांचाही सन्मान झाला.
२२ वा महोत्सव ५, ६ व ७ जानेवारीला
आभार प्रदर्शन करताना प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दिपक चांदोरकर यांनी पुढील वर्षी बालगंधर्व संगीत महोत्सव ५, ६ व ७ जानेवारी २०२४ होणार असल्याचे जाहीर केले. याच महोत्सवाची एक मैफल 'अभंगवाणी' च्या माध्यमातून रविवारी (ता.१५) महात्मा गांधी उद्यानात सकाळी साडेसहाला होणार असल्याची माहीती त्यांनी दिली. सुप्रसिद्ध निवेदिका दिप्ती भागवत यांनी संचालन केले. गुरूवंदना मयूर पाटील यांनी म्हटली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.