Marathi Sahitya Sammelan Amalner : मराठी साहित्य संमेलनात ‘बालमेळावा’; नोंदणीला सुरवात

Bal Melava in Marathi Sahitya Sammelan Registration was started jalgaon news
Bal Melava in Marathi Sahitya Sammelan Registration was started jalgaon newsesakal
Updated on

Marathi Sahitya Sammelan Amalner : साने गुरुजी साहित्यनगरी, अमळनेर (जि. जळगाव), अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर येथे २, ३, ४ फेब्रुवारी २०२४ या तीन दिवसांत होत आहे.

संमेलनाच्या पूर्वसंध्येला १ फेब्रुवारीला कलानंद बालमेळावा होत आहे.(Bal Melava in Marathi Sahitya Sammelan Registration was started jalgaon news)

या संमेलनातील बालमेळाव्यात बालनाट्य, काव्यवाचन, नाट्यछटा, नाट्य प्रवेश, समूहगीत, कथाकथन सादरीकरण करण्यासाठी नोंदणी सुरू झाली. यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

बालमेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. यात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील शालेय विद्यार्थी आपले कलागुण सादर करू शकतात. काव्यवाचनासाठी स्वलिखित कवितांचे सादरीकरण करण्यासाठी २० डिसेंबरला निवड चाचणी होईल.

बालमेळावा उद्‌घाटन सत्रात व समारोप सत्रातील समूहगीतातील गायनाची निवड चाचणी २६ डिसेंबरला सकाळी दहाला होईल. त्यातूनच निवडक मुलांना बालमेळाव्यात समूहगीतात ‘खरा तो एकची धर्म’ व ‘बालसागर भारत होवो’ या गाण्यांवर समूहगीत सादर करण्यासाठी संधी मिळेल.

नाट्यछटा सादरीकरण २७ डिसेंबरला सकाळी दहाला होईल. सर्व निवड चाचण्या साने गुरुजी हायस्कूल, एस. एम. गोरे सभागृह, अमळनेर येथे होणार आहेत. ज्यांना कलानंद बालमेळाव्यात मंच व्यवस्थापनात सहभाग नोंदवायचा असेल, त्यांनी आपापली नावे मंडळाकडे २० डिसेंबर २०२३ पर्यंत पाठवावीत, त्यांची कार्यशाळा घेतली जाईल.

त्या कार्यशाळेतून निवड करून कलानंद बाल मेळाव्यात मंच व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपविण्यात येतील. कलानंद बालमेळावा साहित्य स्वीकारण्याची अंतिम मुदत २० डिसेंबर २०२३ आहे. त्यासाठी मराठी वाङ्‌मय मंडळ, नांदेडकर सभागृह, न्यू प्लॉट, अमळनेर, जि. जळगाव येथे पाठवावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

चिमुकल्यांच्या हस्तेच उद्‌घाटन

कलानंद बालमेळाव्याला उद्‌घाटक म्हणून मुलगा, मुलगी यांची निवड करण्यात येणार आहे. कलानंद बालमेळाव्याचे उद्‌घाटक मुलगा, मुलगी यांची निवड करण्यासाठी ज्या मुला-मुलींच्या कविता, कथा आणि इतर साहित्य प्रकाशित झाले असेल, त्या प्रकाशित झालेल्या साहित्याला नामवंतांनी गौरविले असेल अथवा एखादा साहित्यिक पुरस्कार मिळाला असेल, अशा सातवी ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रस्ताव सविस्तर माहिती व पुराव्यासह मंडळाकडे २० डिसेंबर २०२३ पर्यंत पाठवावेत.

अधिक माहितीसाठी बालमेळावा प्रमुख संदीप घोरपडे (मो. ९४२२२७९७१०), भय्यासाहेब मगर (९४२३९०४४८३), वसुंधरा लांडगे (९६८९०३७८४१), स्नेहा एकतारे (९४२३९०२९६५) यांच्याशी संपर्क साधावा.

असे मिळवा व्हिडिओ

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (९७ वे) बातम्या/ व्हिडिओ मिळविण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा : https://forms.gle/TCSFvFzRQNYhThNB7.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com