OBC Reservation : ओबीसी आरक्षण हे ओबीसी बांधवांसाठी त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेहून अधिक किंमती असून, कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी केले.
अमळनेर येथील माळी समाज ओबीसी आरक्षण निर्धार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. ( Balasaheb Kardak statement of OBC reservation will not affected jalgaon news)
या वेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष भरत माळी (तळोदा), माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, सुधारणा मंडळाचे अध्यक्ष ए. के. गंभीर, निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन, समता परिषदेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख अनिल नाळे, केंद्रीय माळी समाज सुधार मंडळाचे बाबुराव घोंगडे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, नीळकंठ महाजन, नगरसेविका संध्या महाजन (चोपडा), नगरसेवक बापू महाजन, अनिल माळी, सुनील महाजन, हनुमत महाजन, सचिन महाजन, किशोर महाजन, संजय महाजन, महेंद्र महाजन, किरण माळी, प्रवीण महाजन, सुधाकर महाजन आदी उपस्थित होते.
या वेळी निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की ओबीसींच्या आरक्षणाला बाधा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओबीसींच हे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सर्व ओबीसी घटकांना एकत्रित करून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
यासाठी ओबीसीतील मोठा घटक म्हणून माळी समाजाला पुढाकार घ्यावा लागणार असल्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी शालिग्राम मालकर, माजी आमदार शिरीष चौधरी, प्रा. ए. के. गंभीर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी राज्यभरातून ओबीसी समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
यांचा झाला सन्मान
यावेळी माळी समाज भूषण पुरस्काराने प्रा. प्रकाश संतोष माळी (मुंबई), लीलाधर मोतीलाल मगरे (पुणे), उखाभाऊ गणपत पिंपरे (तळोदा), विवेक एकनाथ जाधव (पहूर), मनोहर भगवान महाजन (अमळनेर), बाबूलाल भिका महाजन (शिरपूर), आनंदा महाजन (पारोळा), योगेश भागवत बनकर(पहुर), विठ्ठल नारायण गीते (पिंपळगाव-हरेश्वर), मोतीलाल गणपत माळी (भोजे) यांचा सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.