अमळनेर : बजाज फायनान्सचे कार्यालय फोडून ८६ हजार ३९० रुपये आणि इतर कागदपत्र काढून नेणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख व दोघांसह पाच ते सहा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार यांच्या आई सुरेखा पवार (रा. ढेकू रोड, अमळनेर) यांनी बजाज फायनान्स अमळनेर शाखेकडून ४ लाख २७ हजार रुपये कर्ज घेतले होते. त्याचा हप्ता दरमहा भरण्याचे ठरले असताना डिसेंबर महिन्याचा हप्ता खात्यात रक्कम शिल्लक नसल्याने ऑनलाइन हप्ता बाऊन्स झाला. (Balasaheb Shiv Sena Crime against Taluka Pramukh Case of vandalism Finance office Jalgaon News)
म्हणून फायनान्सचे ललित सूर्यवंशी, जयेश कदम हे कर्मचारी राहिलेल्या हप्त्याची रक्कम घ्यायला घरी गेले असता प्रथमेश पवार याने मंगळवारी (ता. १०) सायंकाळी सहापर्यंत देतो, असे सांगितल्याने कर्मचारी परत आले होते.
मात्र सायंकाळी पावणेसातच्या सुमारास प्रथमेश पवार, सनी सुरेंद्र अभंगे व सचिन सुरेंद्र अभंगे दोन्ही (रा. चोपडा नाका, अमळनेर) यांच्यासह पाच ते सहा तरुण न्यू प्लॉट भागातील बजाज फायनान्स कार्यालयात घुसले व शिवीगाळ करत हातातील लाकडी दांड्याने खुर्च्या, लॅपटॉप, संगणक तसेच साहित्याची तोडफोड सुरू केली.
तसेच ड्रॉवरमधील बाऊन्स व ॲडव्हान्स हप्त्याचे ठेवलेले ९६ हजार १४५ रुपयांपैकी ८६ हजार ३९० रुपये आणि इतर कागदपत्रे काढून घेतली. आणि माझ्या घरी वसुलीला आले तर पाहून घेईल, अशी धमकी देऊन कपाट, कुलर, व्हीलचेअर, सीसीटीव्ही कॅमेरे असे दोन, अडीच लाखांचे नुकसान केले. फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फिर्याद दिल्यावरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.