Jalgaon News : कथ्थक जुगलबंदीसह फ्यूजन बँडची रसिकांना मोहिनी

Jalgaon: Mayor Jayashree Mahajan inaugurating Balgandharva Music Festival at Chhatrapati Sambhajiraje Theater Temple by lighting the lamp. Neighbor Dr. Subhash Chaudhary, Rajesh Gadgil, Shubhangi Bharde, Praveen Mahajan, Dr. Vivekananda Kulkarni, Sharadchandra Chappekar, Deepak Chandorkar, Deepika Chandorkar, Bhalchandra Patil etc
Jalgaon: Mayor Jayashree Mahajan inaugurating Balgandharva Music Festival at Chhatrapati Sambhajiraje Theater Temple by lighting the lamp. Neighbor Dr. Subhash Chaudhary, Rajesh Gadgil, Shubhangi Bharde, Praveen Mahajan, Dr. Vivekananda Kulkarni, Sharadchandra Chappekar, Deepak Chandorkar, Deepika Chandorkar, Bhalchandra Patil etcesakal
Updated on

जळगाव : कथ्थक नृत्यातील बनारस घराण्याच्या परंपरेची सौरव आणि गौरव मिश्रा यांनी कथ्थक नृत्याची जुगलबंदीची जळगावकर रसिकांना अनुभूती दिली. तसेच अभिजात संगीताचा आणि पाश्चात्त्य संगीताचा संगम असलेल्या फ्यूजन बँडने स्वरांची रूजवात करीत रसिकांकडून कलावंतांनी दाद मिळवली.

भारतीय अभिजात संगीताचा खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाची सुरवात झाली. (Balgandharva Music Festival Fusion band enthralls fans with Kathak juggling Jalgaon News)

Jalgaon: Mayor Jayashree Mahajan inaugurating Balgandharva Music Festival at Chhatrapati Sambhajiraje Theater Temple by lighting the lamp. Neighbor Dr. Subhash Chaudhary, Rajesh Gadgil, Shubhangi Bharde, Praveen Mahajan, Dr. Vivekananda Kulkarni, Sharadchandra Chappekar, Deepak Chandorkar, Deepika Chandorkar, Bhalchandra Patil etc
Nashik News : टपाल पार्सल सेवेच्या सिस्टीममधून चीन Out! कोरोना प्रादुर्भावामुळे पार्सल सेवा बंद

छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात होणाऱ्या दीपप्रज्वलनाप्रसंगी महापौर जयश्री महाजन, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन चे विश्वस्त डॉ. सुभाष चौधरी, ‘जाई काजळ’चे राजेश गाडगीळ, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, विश्वस्त शरदचंद्र छापेकर, दीपक चांदोरकर, दीपिका चांदोरकर, ‘वेगा केमिकल्स’चे भालचंद्र पाटील, अनदान देशमुख, आर. जे. टिया, अतुल्य भारतच्या सहाय्यक संचालक स्नेहल पाटील उपस्थित होते. उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते दोघंही सत्रातील कलावंतांचा सन्मान करण्यात आला.

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानच्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. जाई काजळ हे आहेत.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Jalgaon: Mayor Jayashree Mahajan inaugurating Balgandharva Music Festival at Chhatrapati Sambhajiraje Theater Temple by lighting the lamp. Neighbor Dr. Subhash Chaudhary, Rajesh Gadgil, Shubhangi Bharde, Praveen Mahajan, Dr. Vivekananda Kulkarni, Sharadchandra Chappekar, Deepak Chandorkar, Deepika Chandorkar, Bhalchandra Patil etc
Nashik News : 4 उपनद्यांसह 67 नाल्यांना पुनर्वैभव! मुंबई IITचा मिठी नदीच्या धर्तीवर प्रकल्प

अभिजात संगीताच्या विश्वात जळगावचे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवाच्या एकवीस आवर्तने स्वराभिषेकाची! यातील प्रथम सत्रात कलावंत उमेश वारभुवन (परकिशन), आशय कुलकर्णी (तबला), रोहित कुलकर्णी (कि-बोर्ड), विनय रामदासन (गायन), अभिषेक भुरूक (ड्रम्स) आणि संदिप मिश्रा (सारंगी) या फ्युजन बँडचे सादरीकरण केले.

मॅसिव अटॅक कलेक्टिव्ह या बँडने सुरवातीला ताल तिनतालमध्ये तबला, ड्रम आणि परकिशनवर राग किरवाणीमध्ये सादरीकरण केले. त्यानंतर राग कौशी कानडामधील एक तराणा ताल एकतालमध्ये गायन, सारंगी आणि की बोर्ड यांच्या बरोबरीने सादर झाला.

तराणा नंतर पंडित जसराजजी यांनी गाऊन प्रसिद्ध केलेला हवेली संगीत हा गायनाचा प्रकार या बँडमध्ये वेगळ्या प्रकारे सादर झाला. यानंतर राग हंसध्वनीमध्ये एक गाणं सर्वांनी मिळून प्रस्तुत केले. आणि मृगनयनी या पंडित जसराज यांनी गायलेल्या रचनेने या कार्यक्रमाचा शेवट झाला.

Jalgaon: Mayor Jayashree Mahajan inaugurating Balgandharva Music Festival at Chhatrapati Sambhajiraje Theater Temple by lighting the lamp. Neighbor Dr. Subhash Chaudhary, Rajesh Gadgil, Shubhangi Bharde, Praveen Mahajan, Dr. Vivekananda Kulkarni, Sharadchandra Chappekar, Deepak Chandorkar, Deepika Chandorkar, Bhalchandra Patil etc
Nashik News: मुख्यमंत्रीसाहेब सातबाऱ्यावर नोंदी पैशांशिवाय होतच नाही! जिल्ह्यातून तक्रारींचा पाऊस

दमदार कथक नृत्याची मेजवानी

बालगंधर्व संगीत महोत्सवात सुप्रसिद्ध सारंगी वादक पंडित भवानी प्रसाद मिश्रा यांचे नातू व सुप्रसिद्ध सतार वादक पंडित अमरनाथ मिश्रा यांचे पुत्र सौरव आणि गौरव मिश्रा यांनी कथक नृत्याची प्रस्तुती केली. त्यांना तबल्यावर संगत दिल्ली येथील प्रख्यात तबला वादक उस्ताद अक्रम खान यांनी केली. कथक नृत्यातील बनारस घराण्याच्यी वैशिष्ट्ये त्यांनी नृत्यातून ठळकपणे दाखवत रसिकांची दाद मिळवली.

सौरव गौरव यांनी त्यांच्या सादरीकरणाची सुरवात राग अहिर भैरव आणि ताल रुपकमध्ये बांधलेली ‘डमरु पानी, शूल पानी, हे नटराजन नमो नमः’ या दमदार शिवस्तुतीने केली.त्यानंतर ताल त्रितालात गुरु पंडित रविशंकर मिश्रा यांच्याकडून शिकलेल्या बनारस घराण्याच्या प्राचीन बंदीशी, तोडे तुकडे, परन, तसेच काका (मौसाजी) पंडित बिरजू महाराजांकडून शिकलेल्या बंदीशी प्रस्तुत केल्या.

ताल त्रिताला नंतर राधाकृष्णाच्या दिव्य प्रेमाची प्रचिती देणारी बंदीश "क्रृष्णप्रिया" वर केलेल्या भावप्रदर्शनाने प्रेक्षकांना मोहित केले.. ह्या दमदार कथ्थक नृत्याची सांगता सौरव गौरव ह्यांनी "आनंद तांडव " ह्या नृत्याने करुन रसिकांची वाहवा मिळवली...

Jalgaon: Mayor Jayashree Mahajan inaugurating Balgandharva Music Festival at Chhatrapati Sambhajiraje Theater Temple by lighting the lamp. Neighbor Dr. Subhash Chaudhary, Rajesh Gadgil, Shubhangi Bharde, Praveen Mahajan, Dr. Vivekananda Kulkarni, Sharadchandra Chappekar, Deepak Chandorkar, Deepika Chandorkar, Bhalchandra Patil etc
Jalgaon News : 12 बाजार समित्यांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा

गुरूवंदना चांदोरकर प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी सादर केली. सुप्रसिद्ध निवेदिका दीप्ती भागवत यांनी संचालन केले.

आज अनुभवा शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायनासह चित्रवेणू

द्वितीय दिनाची सुरवात एका प्रतिभासंपन्न कलाकाराच्या माध्यमातून होईल, ज्यांनी चित्रवेणू या नवीन वाद्याची निर्मीती केली असून हे वाद्य विंड आणि स्ट्रिंग इंन्स्ट्रुमेंटचे कॉंबीनेशन आहे. हा कलावंत अमेरिका येथे वास्तव्यास असून ते मुळचे चेन्नई येथील आहेत. त्यांचे नाव पं. उदय शंकर असून त्यांना तबला संगत मुंबईचे रामकृष्ण करंबेळकर करतील. द्वितीय दिनाचे द्वितीय सत्र पंडित जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायनाने होईल. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे करतील.

Jalgaon: Mayor Jayashree Mahajan inaugurating Balgandharva Music Festival at Chhatrapati Sambhajiraje Theater Temple by lighting the lamp. Neighbor Dr. Subhash Chaudhary, Rajesh Gadgil, Shubhangi Bharde, Praveen Mahajan, Dr. Vivekananda Kulkarni, Sharadchandra Chappekar, Deepak Chandorkar, Deepika Chandorkar, Bhalchandra Patil etc
Accident News : दिल्लीतील अपघाताची पुनरावृत्ती; 15 वर्षाच्या विद्यार्थ्याला कारने नेलं फरफटत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.