Banana Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही नाही; दिवाळी अंधारात जाणार की काय?

banana crop
banana crop esakal
Updated on

Banana Crop Insurance : दिवाळीपूर्वीच केळी उत्पादक शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळणार असल्याचे आश्वासन सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी दिले असले तरी बुधवारी (ता. ८) दिवसभरात तालुक्यातील कोणत्याही उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा झाली नाही.

अखेर हे आश्वासन केवळ पोकळ आश्वासनाच राहते की काय? असा प्रश्न केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.( banana crop insurance compensation of amount has not been deposited in bank jalgaon news )

गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीचा हवाला देत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील उत्पादक शेतकऱ्यांना केळी पीकविम्याची भरपाई दिवाळीपूर्वीच मिळेल, असे आश्वासन दिले आहे व सर्वच प्रसारमाध्यमात त्यांचे वक्तव्य प्रसिद्धही झाले आहे.

मात्र बुधवारी (ता. ८) बँकेच्या वेळेनंतरही तालुक्यातील कुठल्याही केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भरपाईची रक्कम जमा झालेली नाही. याबाबत केळी उत्पादक शेतकरी बँकांमध्ये फोन करून आणि एकमेकांना मोबाईलवर चर्चा करून विचारणा करताना दिसत होते.

banana crop
Banana Crop Insurance : केळी पीकविमा अन् 25 टक्के अग्रिम नुकसानभरपाई... : आयुष प्रसाद

'सकाळ'ने याबाबत विमा कंपनीचे स्थानिक समन्वयक हेमंत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता अशी कोणतीही माहिती आमच्यापर्यंत नसल्याचे त्यांनी सांगितले तर जिल्हा समन्वयक राहुल पाटील यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिसाद दिला नाही. केळी पीकविम्याची भरपाई मिळण्याची मुदत संपून पावणेदोन महिने झाले तरीही भरपाई मिळत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

दोन दिवसांत मिळणार का रक्कम?

आता या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार की काय? अशी संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. उद्या आणि परवा म्हणजे ९ आणि १० नोव्हेंबरला बँका उघड्या आहेत; मात्र त्यानंतर दिवाळीची सुट्टी येणार असल्याने आगामी दोन दिवसांकडेच केळी उत्पादकांचे लक्ष लागून आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन पूर्ण होते की ते केवळ वेळ मारून नेणारे पोकळ आश्वासन ठरते? याकडे केळी उत्पादकांचे लक्ष लागून आहे.

banana crop
Banana Crop Insurance : विमा कंपनीकडे 196 कोटी वर्ग झाले नसल्याची कृषिमंत्र्यांची कबुली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()