Jalgaon Crime News : केळी व्यापाऱ्याच्या दोन ट्रकांची परस्पर विक्री करून सुमारे सात लाख रुपयांत फसवणूक करण्यात आली. (Banana trader cheated of 7 lakhs Deal of one truck and 2 trucks done in mutual name Jalgaon Crime News)
सावदा (ता. रावेर) येथील केळी व्यापारी देविदास राठोड (वय ३७) यांनी ३१ जानेवारीला जळगाव आरटीओ कार्यालयात एजंट शहादत अली यासीन अली (रा. फैजपूर) यांच्या मदतीने मुळ कागदपत्रांची पूर्तता करून ब्रिजेशकुमार प्रकाश यादव (रा. सावदा) यांच्या नावाने ट्रक (एमएच १९, झेड ६९५५) केला.
१९ फेब्रुवारीला देविदास राठोड यांनी ट्रक विक्री केल्याचे स्टेट्स ऑनलाइन चेक केले असता, त्यांनी विक्री केलेला ट्रक ब्रिजेशकुमार यादव यांच्या नावाऐवजी अब्दुल रशीद अब्दुल अजीज (रा. मालेगाव) यांच्या नावे असल्याचे आढळून आले.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
त्यांचा दुसरा ट्रक (एमएच १९, झेड ७०५५)चे परिवहन ॲपवर स्टेट्स चेक केले असता, तो ट्रक ब्रिजेशकुमार यादव यांच्या नावावर दिसून आला. आपण एकच ट्रक विक्री केला असताना, दोन ट्रक वेगवेगळ्या नावावर कशा विक्री झाल्याचे दिसत आहे, म्हणून राठोड यांनी माहिती घेतली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याबाबत श्री. राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात ब्रिजेशकुमार यादव व शहादत अली यासीन अली यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.