न्हावी (जि. जळगाव) : येथून जवळच असलेल्या अट्रावलच्या यावल शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतातील तब्बल २५ लाख रुपयांची केळीची (Banana) खोडे माथेफिरूने कापून फेकल्याचे उघडकीस आले आहे. (banana trunk worth Rs 25 lakhs of farmers in Yawal of Atraval was cut and thrown away by unknown persons jalgaon news)
यावल तालुक्यात मध्यंतरी अनेक शिवारांमध्ये केळी व अन्य पिकांची नासधूस करण्याच्या विकृत घटना घडल्या होत्या. आता पुन्हा एकदा असाच प्रकार यावल शिवारात घडला आहे.
अट्रावल येथील राजेंद्र प्रभाकर चौधरी यांनी यावल शिवारातील शेत गटनंबर ९०७ मध्ये एक हेक्टर ८६ आर. या क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. राजेंद्र चौधरी यांच्यासह त्यांचे पुत्र भूषण चौधरी शेतात गेले असता, त्यांना शेतातील केळीची खोडे मोठ्या प्रमाणात कापून फेकल्याचे दिसून आले.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
राजेंद्र चौधरी यांच्या शेतामधील सात हजार केळीच्या खोडांची व गडांची कापून अज्ञात माथेफिरूंनी फेकल्याचे दिसून आले. याबाबत राजेंद्र प्रभाकर चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यात २५ लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. ही माहिती मिळताच फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे व पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी राजेंद्र चौधरी यांच्या शेताला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केल्याचे वृत्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.