Jalgaon News : फलक भावानुसारच केळी खरेदी-विक्री व्हावी; सभापतींच्या बैठकीत उपाययोजनांबाबत चर्चा

Chairman and representative of Raver, Yaval, Chopra, Bodwad market committee while discussing  measures taken in  market committee regarding the fall in banana price.
Chairman and representative of Raver, Yaval, Chopra, Bodwad market committee while discussing measures taken in market committee regarding the fall in banana price. esakal
Updated on

Jalgaon News : ऐन हंगामात तालुक्यासह जिल्ह्यातील केळीच्या घसरलेल्या भावाबाबत शुक्रवारी येथील बाजार समितीच्या सभापती कक्षात आयोजित केळी पट्ट्यातील बाजार समितींच्या सभापतींच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. (Bananas should be bought and sold according to panel price Discussion regarding measures in Chairman meeting jalgaon news)

केळी बाजारभाव ठरविण्याच्या प्रक्रियेत बऱ्हाणपूर येथील बाजार समितीचा सर्वाधिक प्रभाव असल्याने त्यासाठी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना दोन्ही भागातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि व्यापारी यांच्या संयुक्त शिष्टमंडळासह पुढील आठवड्यातच भेटण्याचा निर्णय आजच्या या बैठकीत घेण्यात आला.

रावेर बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांच्या पुढाकाराने शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस हर्शल पाटील (यावल), सुधीर तराळ (बोदवड), नरेंद्र पाटील (चोपडा), सचिन पाटील (रावेर) या सभापतींसह रावेरचे उपसभापती योगेश पाटील, संचालक योगीराज पाटील, शेतकरी प्रतिनिधी रमेश पाटील, यावल बाजार समितीचे संचालक उज्जैन राजपूत उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chairman and representative of Raver, Yaval, Chopra, Bodwad market committee while discussing  measures taken in  market committee regarding the fall in banana price.
Banana Crop Insurance : केळीच्या नुकसानीपोटी मिळणार प्रतिहेक्टर 'इतक्या' रुपयांचा लाभ

केळीचे बाजारभाव ऐन कापणीच्या हंगामात स्थिर राहण्यासाठी नोंदणीकृत व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. रावेर व बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) बाजार समितीतील मागील आठवडाभरातील दररोजच्या केळी बाजारभावाचा आढावा रावेरचे सचिव गोपाळ महाजन यांनी सादर केला.

रावेर बाजार समितीच्या बोर्ड भावानुसारच केळीची खरेदी-विक्री व्हावी, अनधिकृत केळी व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून धडक मोहीम राबविण्यात यावी, यावर बैठकीत एकमत झाले.

बऱ्हाणपूर येथील लिलाव पद्धतीतून जाहीर होणारे केळीचे भाव हे सर्व देशभर प्रभावी ठरतात. या पार्श्वभूमीवर तेथील बाजार समितीचे प्रशासक असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, बऱ्हाणपूरचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, आमदार शेरसिंह ठाकूर, माजी मंत्री अर्चना चिटणीस, तसेच रावेर, सावदा, वाघोदा, तांदलवाडी, यावल आदी भागातील शेतकरी व व्यापारी प्रतिनिधी आणि केळी पट्ट्यातील सभापती यांचे शिष्टमंडळासह घेण्याचे नियोजन पुढील आठवड्यात करण्यात आले.

Chairman and representative of Raver, Yaval, Chopra, Bodwad market committee while discussing  measures taken in  market committee regarding the fall in banana price.
Jalgaon Banana Rate : केळीचे भाव घसरले; शेतकऱ्यांना फटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.