Jalgaon Crime News : आपण पोलिस आहोत, गावात चोऱ्या होताय अशा पद्धतीने वृद्धेला संमोहित करून शुक्रवारी(ता. २९) दुपारी साडेबाराला पंचाहत्तरवर्षीय आजीच्या हातातील पन्नास हजारांच्या सोन्याच्या बांगड्या एका भामट्याने उतरवून घेतल्या.
जिल्हा पेठ पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.(bangles of old woman were removed by fake police jalgaon crime news)
शहरातील गणेशनगर, चिनार अपार्टमेंट येथे पुष्पाबाई लालचंद बखतवाणी (वय ७५) या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. शुक्रवारी दुपारी आकाशवाणी ते गोधवाडीवाला अपार्टमेंट असे पायी जात असताना दोन पंचवीस ते तीस वर्षीय भामट्यांनी त्यांना गाठले. आजीला बोलण्यात गुंतवून हातातील बांगड्या कधी काढून घेतल्या हे आजीबाईला देखील कळले नाही.
घरी आल्यावर बांगड्या कुठे गेल्या म्हणून त्या शोधू लागल्या. अखेर त्यांना आठवल्यावर कुटुंबीयांसह पुष्पाबाई यांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला हवालदार वंदना राठोड तपास करीत आहेत.
सावधान, अशी असते ‘मोड्स’
आठवडेबाजाराचा दिवस, पेन्शनर पैसे काढण्यासाठी जात असलेल्या तारखा किंवा कुठेतरी धार्मिक कार्यक्रमाच्या जवळच्या परिसरात असे भामटे दबा धरून बसलेले असतात. खास करून वयोवृद्ध मंडळीच त्यांचे सावज असते. दिसायला पोलिसांप्रमाणे बारीक कटिंग, पायात शूज, टीशर्ट, जिन्स पॅन्ट घातलेले हे इराणी भामटे सावज हेरतात. त्यांना आपल्या बोलण्यातून संमोहित करतात.
कधी नातेसंबंध काढून, ‘मी, अमुक एक तुमच्या बहिणीचा नातू किंवा तुमचा भाचा’, असे ओळखायला लावून हातातील वस्तू अलगद लांबविली जाते. बहुतांश प्रकरणात तर वृद्धच आपल्या हातातील दागिने, अंगठ्या काढून त्यांच्या हातात टेकतात.
घरी पोचून संमोहन तुटल्यावर आठवते, की आपल्याला कोणीतरी भेटले व नंतर वस्तू काढून घेतली.अशा अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे. घरातील वृद्ध पेन्शन घेण्यासाठी किंवा एकटेच बाहेर जात असतील, तर कुटुंबीयांनी खबरदारी बाळगावी. एकटे पाठवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.