Jalgaon Crime : आर्थिक डबघाईस असलेल्या येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ताब्यात असलेल्या सावदा येथील नगरपालिकेच्या गाळ्यासंदर्भात पाच लाख रुपयांची लाच धुळे येथे स्वीकारताना पतसंस्थेच्या अवसायकास शुक्रवारी (ता. १८) धुळे येथे अटक करण्यात आली.
येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bank employee arrested while accepting bribe of 5 lakhs jalgaon crime news)
श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेवर प्रशासक म्हणून सखाराम कडू ठाकरे यांची नियुक्ती केलेली होती. या पतसंस्थेच्या सावदा पालिकेच्या अंतर्गत असलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्याच्या मालकाने कर्ज थकीत केल्याने हा गाळा पतसंस्थेने जप्त केला होता.
गाळामालकाने कर्जफेडीची प्रक्रिया पूर्ण केल्यावरही संबंधित गाळा आणि त्याची अनामत रक्कमही त्याच्या नावावर करून देण्यासाठी सखाराम ठाकरे यांनी गाळा मालकाकडे पाच लाख रुपयांच्या रकमेची मागणी केली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
गाळामालकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने शुक्रवारी पहाटे सखाराम ठाकरे (वय ५६, रा. ११, राधेय को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, पाचोरा) यांना धुळे येथे लाच घेताना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे निरीक्षक हेमंत भेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रूपाली खांडवे व सहकारी राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागूल, मकरंद पाटील व वाहनचालक सुधीर मोरे यांच्या पथकाने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.