Jalgaon News : आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहा : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

NCP Jayant Patil
NCP Jayant Patilesakal
Updated on

Jalgaon News : पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आपल्या मतदारसंघात बूथरचना भक्कम करून संपूर्ण मतदारसंघ ‘वन बूथ ट्वेन्टी यूथ’ हे अभियान राबवून मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची व युवा कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज राहा, असे सूतोवाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

त्यांनी माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून आढावा घेतला. (Be ready for upcoming elections State President Jayant Patil During visit to Parola Dr. Hitguj with Patil Jalgaon News)

अमळनेर येथे शुक्रवारी (ता. १६) ग्रंथालय सेलच्या राज्यस्तरीय शिबिरप्रसंगी कार्यक्रमाला आलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पारोळा येथे डॉ. पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीप्रसंगी आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.

या वेळी चाळीसगाव येथील माजी आमदार राजीव देशमुख, ललित बागूल, माजी आमदार दिलीप सोनवणे, जिल्हा बँक सदस्य घनश्याम अग्रवाल, अनिल साठे, डॉ. चंद्रकांत, जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख डॉ. शांताराम पाटील, जिल्हाध्यक्ष व्यापार उद्योग आघाडी मनोराज पाटील, पारोळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संतोष महाजन, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सुधाकर पाटील, संचालक रेखा सतीश पाटील, उद्योगिनी वर्षा पाटील, सुनील रामोशी, निंबा पाटील, युवक अध्यक्ष योगेश रोकडे, अंकुश भागवत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NCP Jayant Patil
Jalgaon News : उदीड, मूग, तुरीच्या पेरण्यांवर यंदा परिणाम होण्याची शक्यता; शेतकऱ्यांची चिंता वाढली

सदिच्छा भेटीप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यासह कुटुंबीयांनी सत्कार केला.

सदिच्छा भेटीदरम्यान डॉ. पाटील यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुका व येणारी शेतकी संघ निवडणूक याबाबत महाविकास आघाडीतून चांगले उमेदवार देत एरंडोल, पारोळा, भडगाव मतदारसंघात पक्ष बळकटीबरोबर राष्ट्रवादीचा झंजावात सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही या वेळी डॉ. पाटील यांना दिली.

NCP Jayant Patil
Nashik News : धार्मिक एकोपा वृद्धींगत करणारा बोहाडा सुरू; धूमधडाक्यात विविध सोंगांसाठी गावकरी सज्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.