Jalgaon News : औरंगाबाद पोलिसासह एकास मारहाण; हॉटेलमध्ये ‘टपोरी गँग’ चा हल्ला; एक अटकेत

Crime News
Crime Newsesakal
Updated on

जळगाव : कुसुंबा (ता. जळगाव) गावाजवळील हॉटेल राकेशमध्ये जेवणाला थांबलेल्या औरंगाबाद पोलिस कर्मचाऱ्यासह त्याच्या मित्राला मारहाण करण्यात आली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, २४ तासांत एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

जामनेर येथील मुळ रहिवासी मिर्झा मोहंमद इसराल हिमायू बेग (वय ३८) सोयगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

सोमवारी (ता. ९) मिर्झा मोहंमद बेग त्यांचे मित्र समीर सलीम शेख (रा. जामनेर) यांच्यासोबत दुचाकीने जळगावला आले होते. जळगाव शहरालगत प्लॉट खरेदीसाठी त्यांचा प्रयत्न सुरू असून, मित्र समीर शेख यांच्याकडे विक्रीला आलेला प्लॉट पाहण्यासाठी दोघेही जळगावात आले. (Beating one with Aurangabad police Tapori gang attack in hotel Jalgaon Crime News)

Crime News
Nashik News : विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राचे विस्तारीकरण; सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी

पाहणी केल्यानंतर पुन्हा दुचाकीने मित्रासोबत जामनेरकडे जात असताना, कुसुंबा गावाजवळील हॉटेल राकेशमध्ये दोघे मित्र जेवणाला थांबले. समीर शेख टेबलावर बसले असताना, हवालदार मोहंमद मिर्जा बाथरूमला गेले होते. समोरच्या टेबलावर बसलेल्या तिघांनी आम्ही पोलिस आहेत, असे खोटे सांगून विनाकारण चौकशी करायला सुरवात केली.

हवालदार मिर्झा टेबलाजवळ येत नाही, तोपर्यंत वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. तिघांनी समीर शेख व मिर्झा यांनाही मारहाण केली. जखमी अवस्थेत मिर्झा यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. नंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. तोपर्यंत संशयित फरारी झाले होते.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

Crime News
Nashik News : उद्यानातील खेळण्या चोरट्यांकडून लंपास; मृत्युंजय महादेव मंदिर उद्यानाची दुरवस्था!

सीसीटीव्हीतून ओळख पटली

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलिस नाईक किशोर पाटिल, विकास सातदिवे यांनी हॉटेल मालकाची चौकशीनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले. हॉटेल मालक विलास पाटील यांनी मारहाण करणाऱ्यांनी ओळख पटवली. त्यावरून आकाश विश्वे, सुनील सुभाष साबळे, सुनील सोनार (तिघे रा. सुप्रीम कॉलनी) यांचे पोलिसांनी शोध सुरू केला. सुनील सुभाष साळवे याला पथकाने अटक केली आहे.

टपोरी गॅंगचा उच्छाद

सुनील साबळे, आकाश विश्वे, सुनील सोनार सुप्रीम कॉलनीसह, एमआयडीसी परिसरात चोऱ्या करून पैसे लुबाडणुकीचे काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

Crime News
Nashik News : विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राचे विस्तारीकरण; सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()