Jalgaon Crime : दुरंतो एक्स्प्रेसमधून मुंबई ते सतना दरम्यान पत्नीसह प्रवास करणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्याला तिकिटाबाबत विचारल्याचा राग आल्याने त्याने तिकिट तपासणीसाला (सीटीआय) मारहाण करीत गाडीमध्ये राडा केला.
तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Beating ticket inspectors by RPF in duronto express jalgaon crime news)
माहिती अशी, की शनिवारी (ता. २६) दुरंतो एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२२९३) ही मुंबईवरून प्रयागराजकडे जात असताना ए. सी. कोच सेकंडमध्ये तिकिट तपासनीस (सीटीआय) मनोज सिन्हा हे तिकीट तपासणी करीत होते. या वेळी त्यांनी गाडीतून पत्नीसह प्रवास करणारे रेल्वे सुरक्षा बलाचे ए. के. अजमेरा यांना तिकिट किंवा पासबाबत विचारणा केली.
तिकीट मागणी केल्याचा राग आल्याने अजमेरा (रा. सतना) यांनी सीटीआय मनोज सिन्हा यांना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी तेथून जेवण घेऊन जात असलेले वेटर रामदयाल तिवारी यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता तिवारी यांना देखील अजमेरा यांनी मारहाण केली.
ही इगतपुरीदरम्यान घडली. दुरंतो एक्स्प्रेस मुंबईवरून भुसावळला थांबत असल्याने या घटनेबाबत सिनियर डीसीएम तसेच कँटोल व रेल्वे सुरक्षा बल विभागाला माहिती कळविली. दुरंतो एक्स्प्रेस ही भुसावळ फलाटांवर पोहचताच आयआरटीसीएसओ युनियन व चेकिंग स्टॉफचे असे २०० कर्मचारी यांनी घटनेचा निषेध करीत घोषणाबाजी केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या दरम्यान रेल्वे सुरक्षा बल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संशयित ए. के. अजमेरा व त्यांच्या पत्नीस वाचविण्याचा प्रयत्न केला. तसेच दबाबही आणला. मात्र कुठल्या दबावाला बळी न पडता युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मनोज सिन्हा यांना लोहमार्ग पोलिस ठाणे, भुसावळ येथे नेले व झालेल्या घटनेसंदर्भात माहिती दिल्यावरून रविवारी (ता. २७) रात्री बाराच्या दरम्यान लोहमार्ग पोलिस ठाण्यात आरपीएफविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी घडली घटना
मुंबई येथून प्रयागराजकडे जाणाऱ्या दुरंतो एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) विभागाचे कर्मचारी ए. के. अजमेरा हे पत्नीसह मुंबई ते सतना दरम्यान प्रवास करीत होते. मुंबई विभागाचे सीटीआय मनोज सिन्हा यांनी अजमेरा यांना तिकीट अथवा पासबाबत विचारले असता त्यांच्याजवळ कुठलाही पास तसेच तिकीट नव्हते.
मात्र विचारल्याचा राग आल्याने आरपीएफ अजमेरा यांनी सीटीआय मनोज सिन्हा यांच्याशी अरेरारी केली. इगतपुरीदरम्यान सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान दुरंतो एक्स्प्रेसमध्ये राडा करीत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात आरपीएफविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.