Jalgaon News : अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठेनिमित्त 20 चौकांचे सुशोभिकरण

आमदार सुरेश भोळे यांच्यातर्फे शहरातील तब्बल २० चौक सजविण्यात येणार आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Chowk decorated with flags in the city on the occasion of Ram Mandir Pran Pratishtha ceremony in Ayodhya.
Chhatrapati Shivaji Maharaj Chowk decorated with flags in the city on the occasion of Ram Mandir Pran Pratishtha ceremony in Ayodhya.esakal
Updated on

Jalgaon News : अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात २२ जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्या निमित्ताने शहरातही कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. आमदार सुरेश भोळे यांच्यातर्फे शहरातील तब्बल २० चौक सजविण्यात येणार आहे.

तर शहरातील श्रीराम मंदिरात अयोध्या येथील सोहळ्याचे एलईडी टीव्हीवर लाईव्ह दाखविण्यात येणार आहे. (Beautification of 20 Chowks in jalgaon city for occasion of Ramla Pran Pratishtha in Ayodhya news)

शहरातील चौकाच्या सुशोभीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. चौकात भगवे झेंडे लावण्यात येत असून भगव्या पतकाही लावण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी श्रीरामाचे प्रतिमा असलेला भव्य ध्वज लावण्यात येत आहे.

शहरातील महिला बचत गट झेडें तयार करीत आहेत. तर युवकांच्या गटाला झेंडे लावण्याचे काम देण्यात आले आहे. स्वरराज इव्हेंटच्या माध्यमातून हे काम करण्यात आहे.

वीस चौकांचे सुभोभीकरण

शहरातील तब्बल वीस चौक सजविण्यात येणार आहे. सद्यस्थितीत कोर्टाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौक सजविण्यात आला आहे. या शिवाय सतरा मजली चौक, शास्त्री टॉवर चौक, पांडे चौक, आकाशवाणी चौक.

अजिंठा चौफुली, आस्वाद चौक, इच्छादेवी चौक, संत गाडगेबाबा चौक, कालिंका माता चौक, पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महेश चौक, अयोध्या नगर श्रीराम मंदिर चौक, चौबे शाळा चौक, हॉटेल गोल्डन नेस्ट चौक, खोटे नगर व बजरंग बोगदा चौक सजविण्यात येणार आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj Chowk decorated with flags in the city on the occasion of Ram Mandir Pran Pratishtha ceremony in Ayodhya.
Ram Mandir Ayodhya: अभिषेक करण्यापूर्वी रामलल्लाची मूर्ती मंदिराच्या गाभार्‍यात आणली, VIDEO पाहा...

मंदिरात अयोध्येचे थेट प्रक्षेपण

श्रीराम मंदिरात अयोध्या येथील सोहळ्याचे २२ रोजी थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. असल्याची माहिती आमदार भोळे यांनी दिली सोहळ्याचे शहरातील श्रीराम मंदिरात एलईडी टीव्हीवर दाखविण्यात येणार आहे.

जळगावातील श्रीराम मंदिर, पिंप्राळा येथील श्रीराम मंदिर, मेहरूण येथील श्रीराम मंदिर, अयोध्यानगरातील श्रीराम मंदिर, चिमुकले श्रीराम मंदिर, तसेच वाल्मीक नगरातील वाल्मीक ऋषी पुतळ्याजवळ एलईडी टीव्ही लावण्यात येतील व भाविकांना सोहळा पाहण्यासाठी सुविधा करण्यात येणार आहे.

श्रीराम कथेचे आयोजन

शहातील भाविकांसाठी शनिवारपासून (ता.२०) बुधवार (ता.२४) पर्यंत श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील शिवतीर्थ (जी.एस.) मैदानावर दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत कथा सोहळा होणार आहे.

चिमुकले राममंदिराचे पुजारी दादा महाराज जोशी कथावाचन करणार आहेत. भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे अवाहनही आमदार भोळे यांनी केले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Chowk decorated with flags in the city on the occasion of Ram Mandir Pran Pratishtha ceremony in Ayodhya.
Ram Temple Ayodhya Security: ATS कमांडोच्या सुरक्षेखाली अयोध्या! 360 डिग्री सुरक्षा कव्हरेजसाठी अँटी-माइन ड्रोन तैनात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.