Jalgaon News : येथील शहराचे मध्यवर्ती, महत्त्वपूर्ण व तेवढेच संवेदनशील असलेल्या आठवडे बाजार भागाला आता नवा देखणा लूक मिळणार असून, यासाठी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी हिंदू, मुस्लिम बांधवांना विश्वासात घेऊन काढलेले अतिक्रमण, आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला पाच कोटींचा निधी यामुळे नवीन व्यापारी संकुल उभारणीच्या कार्याला गती मिळाली आहे. शहर विकासाचे हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.
येथील आठवडे बाजारचा परिसर संवेदनशील आहे. आतापर्यंत शहरात जे जातीय तणाव निर्माण झाले, त्याचा उगम याच परिसरातून झाला आहे. या भागात नूर मशीद, शनी मंदिर, मारुती मंदिर, साईबाबा मंदिर, मरिमाता मंदिर, महादेव मंदिर असून, हिंदू, मुस्लिम अशा दोन्ही धर्मीयांची वस्ती व दुकाने येथे आहेत.(Best commercial Complex will be set uest cop in Pachora Encroachments removed Weeks will get a new look for market for five crore Jalgaon News)
या भागाची संवेदनशीलता पाहता गेल्या काही वर्षांपूर्वी येथे पोलिस चौकीची स्वतंत्र इमारतही तयार करण्यात आली आहे. हा परिसर हिवरा नदीकाठी असल्याने शौचासाठी व लघुशंकेसाठी या भागात अनेक जण येतात. त्यामुळे दुर्गंधी, डास, चिलटे यांच्या उपद्रवासह वाहतुकीला अडथळा व वाहतुकीची कोंडी हे प्रश्न येथे कायम आहेत.
गणपती, देवी यांच्या मिरवणुकांसह शहरातील प्रत्येक मोर्चा, आंदोलन, जाहीर सभा यासाठी हा भाग महत्त्वपूर्ण ठरला आहे.
येथे दोन दुकानांच्या मधल्या जागेत काही अतिक्रमित टपरी सदृश्य दुकानांचे अतिक्रमण होते. हिंदू व मुस्लिम धर्मीय तेथे गेल्या ४० वर्षांपासून व्यवसाय करत होते. आतापर्यंत शहरात अनेक अतिक्रमण हटाव मोहिमा झाल्या, परंतु हे अतिक्रमण हटवण्याचा कोणीही प्रयत्न अथवा हिंमत दाखवली नाही.
परंतु विकासशील दृष्टीच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी या भागाला देखणे रूप देण्यासाठी अतिक्रमण काढणे आवश्यक आहे, अशा सूचना येथील हिंदू, मुस्लिम व्यावसायिकांना केल्या. त्यासाठी अनेकदा या भागाला भेटी दिल्या. दुकानदारांच्या अनेकदा बैठका घेतल्या व त्यांची मानसिकता तयार केली.
निदान पुढच्या पिढीसाठी तरी आपण अतिक्रमण हटवून या भागात नवीन मोठे व्यापारी संकुल उभारण्यासाठी सहकार्य करा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यास दुकानदारांनी मंजुरी दिल्याने गेल्या ४० वर्षांपासून असलेले अतिसंवेदनशील असे अतिक्रमण काढण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे या भागात आता व्यापारी संकुल उभारणीचा मार्ग मोकळा होऊन परिसराला देखणा लूक मिळणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आमदार किशोर पाटील यांनी या व्यापारी संकुलासाठी पालिकेच्या माध्यमातून पाच कोटींचा निधी मंजूर केला असून, आठवडे बाजार संकुल उभारणीचा ठेका रवी केसवानी यांना देण्यात आला आहे. संकुल उभारणीच्या कामाला गती दिली जात आहे. यासाठी आमदार किशोर पाटील, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना धन्यवाद दिले जात आहेत.
संकुल ठरणार एकतेचे प्रतीक
विशेष म्हणजे, आमदार किशोर पाटील यांच्या नियोजनानुसार या परिसरातून स्मशानभूमी मार्गे जळगाव रस्त्याला जोडणारा मार्ग तयार होत असल्याने हा परिसर व येथील व्यवसाय विकसित होण्याला मोठी मदत मिळणार आहे.
सुंदर शहर व वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या या व्यापारी संकुलात हिंदू-मुस्लिम बांधव व्यवसाय करणार असल्याने हे संकुल एकतेचे प्रतीक ठरून या भागाला लाभलेले संवेदनशील हे नाव संपुष्टात येण्याचा आशावाद व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.