Jalgaon Sand Transport News : अवैध खडी उद्योगाच्या सलग तक्रारीनंतरही कारवाई नाही; उपोषणाचा ईशारा

Illegal business that is being carried on with placards
Illegal business that is being carried on with placardsesakal
Updated on

Jalgaon News : भडगाव तालूक्यात कालबाह्य वाहनांद्वारे अवैध गौणखनीज विक्रीचा उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. गौणखनिज विक्रीचा व साठा करण्याचा कुठलाही परवाना नसताना राजरोसपणे हा अवैध धंदा सुरु आहे.

वारंवार तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने, अखेर शेतकऱ्याने आमरण उपोषणाचा ईशारा दिला आहे.

साठेबाजीसह, व्यवसायाचा फलक, जुनाट वाहनांचे फोटोसह सर्व पुरावे सादर केले असताना तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी मात्र तेथे असा कुठलाच उद्योग नसल्याचे म्हणत संबधीतांची पाठराखण केली आहे. (Bhadgaon illegal gravel industry No action taken even after repeated complaints Revenue stocked and sold of RTO Crores of lost revenue hunger strike Jalgaon News)

याबाबत जिल्हधिकारी कार्यालयात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, टोणगाव (ता. भडगाव) शिवात शेतजमिन (गट नं. ५६१/१) शेतमालक कादिर खान हाजी जोरावर खान यांच्या नावे आहे. कादिर खान हे व्यवसायानिमित्त गोविंदवाडी (जि. कल्याण) येथे स्थायिक असल्याने, अनेक वर्षांपासुन त्यांची शेतजमीन पडीत आहे.

या शेतजमीनीवर ‘सुंदरबन स्टोन’ सप्लायर्स या नावाने गौण खनीज विक्रीचा उद्योग थाटण्यात आला आहे. विक्रेत्यांकडे गौण खनीज विक्री व साठ्याचा कुठलाही परवाना नसताना मोठ्या प्रमाणवर हा उद्योग करण्यात येत असल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासुन आहेत.

एरंडोल तहसीलच्या हद्दीतून बेकादेशीर वाहतुक करुन त्याचा साठा येथे करण्यात येतो. या संदर्भात तक्रारदार शेतकरी शेख शकील शेख बाबू यांनी महसुल आणि उपप्रादेशीक अधीकाऱ्यांना वारंवार तक्रारी करुन निदर्शनास आणुन दिले.

तरीही कारवाई होत नाही. या उलट तक्रारदारांना धमकावले जात असल्याने अखेर त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतल्याचे निवेदनात नमुद केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Illegal business that is being carried on with placards
Nashik Wedding Gift : लग्नापेक्षा होत होती आहेराचीच चर्चा! मित्राच्या मुलीला दिला 'हा' अनोखा आहेर...

कोट्यवधीचा महसुल बुडीत

भडगाव येथील चाळीसगाव रोडलगत पडित शेत जमीनीवर मोठ्या प्रमाणावर साठा असल्याचे तक्रारीत नमुद असून, स्थानिक महसुल प्रशासनाने अद्यापही त्याच्यावर कुठलीच कारवाई न केल्याने हा संपुर्ण साठा इतरत्र हलवण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या १५ ते १८ वर्षांपासुन हा सर्व बेकायदेशीर उद्योग महसुल प्रशासनाच्या आशिर्वादाने सुरु असून, त्यातून कोट्यवधी रुपयांचा महसुल संबधीतांनी बुडविला असताना कारवाई तर सोडाच, पण आता पाठराखण सुरु आहे.

नगरपालिकाही निद्रीस्थ

मुळात पडीत शेतजमिनीवर बेकायदेशिररित्या ६००० स्केअर फुट बांधकाम केलेले आहे. बांधकाम करताना बिनशेती, टाउन प्लॅनिंग विभाग, नगरपरिषद वा अन्य संबंधीत विभागांची परवानगीदेखील घेतलेली नसून, संबधीतांनी नगरपालिका व शासनाची शुद्ध फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शासनाच्या महसुलाची पहिल्या दिवसांपासुन संपुर्ण वसुली करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे.

Illegal business that is being carried on with placards
Amravati News: आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने तणाव! पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोल्हापूरची पुनरावृत्ती टळली

‘उपप्रादेशीक’ चा आशिर्वाद

संबधीतांतर्फे कालबाह्य जुनाट वाहनांमधुन गौणखनीज वाहतुक सुरु असून, मोठा अपघात घडून जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वाहनांसदर्भात उपप्रादेशीक परिवहन अधीकारी शाम लोही यांनी गेल्या महिन्यातच कारवाईच्या लेखी सुचना आरटीओ पथकाला केल्या आहेत.

तक्रारदार वाहन कुठे लपविले जाते, याची माहिती देण्यासही तयार असताना कारवाई होत नाही. अशाच वाहनाने गेल्या महिन्यात चोपडा तालूक्यातील आमदारांच्या वाहनास धडक दिली असताना व जिल्ह्यात कालबाह्य वाहनांवर कारवाई अपेक्षीत असताना आरटीआ कार्यालयातर्फे कुठलेही पावले अद्याप उचलली गेलेली नाहीत.

"आपसी वादातून तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार संबधीतांची चौकशी करण्यात आली. त्यांनी खासगी बांधकामासाठी गौणखनिज मागविल्याचा लेखी जबाब आहे. त्यांचा खडी किंवा गौणखनीज खरेदी-विक्रीचा व्यवसाय नसल्याचे त्यांनी लिहून दिले आहे. पुन्हा तक्रार आल्यावर आम्ही त्यांना याबाबत खुलासा मागीतला आहे."

-मुकेश हिवाळे, तहसीलदार, भडगाव

Illegal business that is being carried on with placards
Jalgaon News : झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()