Jalgaon Drought News : पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने दोन्ही तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची आज मुंबईत भेट घेऊन केली. त्यांनी मंत्रिमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
पाचोरा व भडगाव तालुक्यात अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामाची दैना झाली आहे. उत्पन्नात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. (Bhadgaon Pachora will be declared drought prone jalgaon news)
यासाठी आज आमदार किशोर पाटील पाटील यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन दुष्काळाबाबतची वस्तुस्थिती सांगितली. दोन्ही तालुक्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केल्यानंतर त्यावर मंत्री अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. यापूर्वीही आपण मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊन त्यांच्याकडे दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
विम्याची अग्रिम मिळणार
भडगाव तालुक्यातील १८ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विम्याची २५ अग्रिम रक्कम दिवाळीत मिळणार आहे. यात जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ३१७ शेतकऱ्यांना ७६ कोटी ४० लाख ४ हजार ६०७ रुपये नुकसान भरपाई पोटी मंजूर झाले आहेत. ते शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार आहेत. राज्यातील लोकप्रतिनिधींचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे विमा कंपन्यांनी अग्रिम रक्कम देण्याचे मान्य केल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
११ जूनच्या भरपाईबाबत बैठक
भडगाव तालुक्यात विशेषतः: गिरणा पट्ट्यात ११ जून २०१९ ला वादळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याची अद्यापही भरपाई मिळालेली नाही. याबाबत आमदार किशोर पाटील यांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. शिवाय शेतकरी देखील उपोषणाला बसले होते. याबाबत गुरुवारी (ता. ९) मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. आमदार किशोर पाटील यांनी खास बाब म्हणून मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
"पाचोरा-भडगाव तालुक्यात खरिपाची अक्षरश: माती झाली आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांची भेट घेऊन दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केल्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दाखवला. कुठल्याही परिस्थितीत दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत मी ठाम आहे." - किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.