BHR Scam Upadte : ‘बीएचआर’ पतसंस्थेच्या अवसायकांची उचलबांगडी?

BHR Scam
BHR Scamesakal
Updated on

जळगाव : राज्यात सोळाशे कोटींच्या गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी या बहुचर्चित अवसायनातील पतसंस्थेवर नागपूर येथून बदलून आलेले सहाय्यक निबंधक चैतन्य नासरे यांची आठवडाभरात उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.

राज्य सहकार आयुक्तांनी केंद्रीय सहकार निबंधकांना तडकाफडकी अहवाल पाठविल्याने नासरे यांना मूळ पदावर परत जावे लागणार असून, नवे अवसायक म्हणून शिरपूर तालुक्याचे सहाय्यक निबंधक अशोक बागल यांच्या नियुक्तीचा प्रस्तावही केंद्राकडे सादर करण्यात आला आहे. (Bhaichand Hirachand Raisoni Credit Institutions Assistant Registrar Chaitanya Nasare There is a possibility transfer Jalgaon News)

BHR Scam
Nashik Crime News : नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच

पुण्यातील डेक्कन, शिक्रापूर आणि आळंदी पोलिसांत तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यावर नोव्हेंबर २०२० मध्ये गुन्हे दाखल झाल्यावर बीएचआर संस्थेवर अवसायक म्हणून चैतन्य नासरे यांची जानेवारी २०२१ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

नासरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तत्कालीन चेअरमन आणि संचालकांच्या कार्यकाळातील लेखापरीक्षण पूर्ण केले. मात्र, एमपीआयडी कायद्याने गुन्हे दाखल असलेल्या सर्व १४ जणांवर दोन वर्ष उलटूनही जबाबदारी निश्चित करता न आल्याने पुढे न्यायालयीन अडचण येणार असल्याचा ठपका ठेवत त्यांची उचलबांगडी करण्याचा अहवाल राज्य सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केंद्राकडे पाठविला आहे.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

BHR Scam
Crime News : शिक्षकाने विद्यार्थीनीला कॉपीगर्ल म्हटलं; तिने केलं असं काही की...

ठेवींच्या पावत्या जमा करण्याचा उद्योग अंगलट

चैतन्य नासरे यांनी गेल्या कार्यकाळात जितेंद्र कंडारे यांनी केलेल्या कारभाराचीच पुनर्रावृत्ती सुरू ठेवली. कर्जवसुलीच्या प्रमाणात ठेवीदारांना परतावा करणे गरजेचे असताना, आणि तेवढ्याच ठेवीदारांच्या मूळ पावत्या आणि केवायसी कागदपत्रे मागविण्याची आवश्यकता असताना, नासरे यांनी नुसत्याच मूळ पावत्यांची प्रकरणे जमा करून जळगाव कार्यालयात ठप्पी लावण्याचे उद्योग चालविले होते. त्यामानाने ठेवीदारांना ठेवींचा परतावा मात्र झाला नाही.

त्यामुळे राज्य सहकार आयुक्त आणि विभागीय सहनिबंधकांची नासरे यांच्याबद्दल नाराजी होती. दरम्यान, एक- एक वर्षाचा असे दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर मुदतवाढ न देता त्यांनी बीएचआर संस्थेचा अवसायकपदाचा राजीनामा देऊन त्यांच्या मूळ पदावर नागपूर येथे रुजू होण्याचे सहकार आयुक्तांनी आदेश दिले.

असे असताना नासरे यांनी मात्र चांगले काम करीत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर वारंवार व्हायरल केल्याचा उद्योग जळगावच्या ठेवीदार संघटनेच्या एका (ठेवीदारांच्या हातून मार खाल्लेल्या) नेत्याने केला आणि ही बाब सहकार खात्याच्या वरिष्ठांच्या निदर्शनात आल्याने त्यांची मोठी अडचण झाली. येत्या आठवड्यात नासरे यांची बदली होऊन अशोक बागल यांची अवसायक म्हणून नियुक्तीवर केंद्राकडून शिक्कामोर्तब होऊन आदेश काढले जाणार असल्याचे समजते.

BHR Scam
Jalgaon News : ग्राहक पंचायतीतर्फे उद्या मोफत आरोग्य तपासणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.