शेतकरी कुटुंबातील महिलांना स्वयंरोजगाराची साधने

‘भरारी’चा उपक्रम; फाउंडेशनची सेवा वेबसाइटद्वारे झाली डिजिटल
bharari foundation self employment tools to women from farming families jalgaon
bharari foundation self employment tools to women from farming families jalgaonsakal
Updated on

जळगाव : शेतकऱ्यांसह सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या भरारी फाउंडेशनची सेवा आता एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. या सेवांच्या संदर्भात ‘भरारी’ची वेबसाइट कार्यान्वित करण्यात आली आहे.सध्याच्या डिजिटल युगात भरारीला शेतकऱ्यापर्यंत आणि शेतकऱ्यांना भरारी तसेच प्रशासनापर्यंत सहज पोचण्यासाठी भरारी फाउंडेशन आता वेब-साईटवर देखील उपलब्ध झाले जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ह्या संकेतस्थळाचे उद्‌घाटन करण्यात आले.

शेतकरी कुटुंबातील महिलांचे प्रशिक्षण

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकरी, यांना उभारी देण्यासाठी भरारी फाउंडेशन, व जिल्हा कृषी प्रशासन यांच्या वतीने शेतकरी संवेदना, उभारी अभियान राबविण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा व त्यांच्या गावातील गरज पाहता ३ महिलांना मोठी पिठाची गिरणी, २ महिलांना फुल शटल शिलाई मशीन व १ महिलेला संगणक देण्यात आले.

जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील शारदा रवींद्र पाटील (मोंढाळा), प्रतिभा गोपाल पाटील (खेडी ढोक), लक्ष्मीबाई लक्ष्मण बंजारा (तरडी), सोनाली विजय पाटील (खेडी ढोक), अनिता वसंत पवार (तरडी), वनिता कडुबा शिंदे (वरखेडी) अशा ६ महिलांना रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने मोठी पिठाची गिरणी, फुल शटल शिलाई मशिन व संगणक वाटप करण्यात आले.

भरारीच्या या व्यापक कार्याला जगापर्यंत पोचवण्यासाठी आणि शेतकरी बांधवांसाठी शासनाच्या योजना आणि फायदे त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी www.bhararifoundation.com या संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी वेबसाईट बद्दल माहिती व प्रास्ताविक दीपक परदेशी यांनी केले.या वेळी उद्योजक रजनीकांत कोठारी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, महेंद्र कोठारी, उद्योजक रवी लढ्ढा, रमेशकुमार मुणोत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.