BHR Case : ॲड. कीर्ती पाटलांना कागदपत्रे पुरविले कुणी? सरकारपक्षातर्फे प्रखर युक्तिवाद

BHR Scam
BHR Scamesakal
Updated on

जळगाव : बीएचआरमध्ये (BHR) सभासद, भागधारक किंवा कुठल्याही ठेवीदार पक्षकार नसतांना ॲड. कीर्ती पाटील यांच्या वतीने केंद्रीय मंत्री आणि रजिस्ट्रार यांच्याकडे तक्रारी झाल्या.

त्या सर्व फॉरेन्सिक ऑडिटर शेखर सोनाळकर यांचे काम थांबविल्यानंतर झालेल्या आहेत. (bhr case Who provided documents to advocate Kirti Patil Strong arguments by ruling party jalgaon news)

तर, डेक्कनच्या गुन्ह्यात तेथील महिला ऑडिटर आणि तपासाधिकार्यांना धमकावल्या प्रकरणी ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या तक्रारी आहेत. गुन्ह्यात संशयितांची अटक आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारपक्षातर्फे मांडण्यात आला.

सूरज झंवर यांच्याकडून एक कोटी २२ लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात प्रमुख संशयित ॲड. प्रवीण चव्हाण, शेखर सोनाळकर यांच्या जामीन अर्जावर न्या. जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात कामकाज सुरू आहे.

शुक्रवार (ता. १०) रोजी बचावपक्षातर्फे ॲड. गोपाळ जळमकर यांनी प्रदीर्घ युक्तिवाद मांडल्यानंतर सरकारपक्षातर्फे सोमवार आणि मंगळवार सलग दोन दिवस युक्तिवाद मांडला जात आहे. सकाळी ११ वाजता न्यायालयात कामकाजास सुरवात झाली.

फिर्यादीतर्फे ॲड. सागर चित्रे, ॲड. पंकज पाटील यांनी युक्तिवाद मांडला. ॲड. पंकज पाटील यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे दाखले सादर करत मूळ फिर्यादीवर आपला युक्तिवाद मांडला. दोन्ही पक्षाचा जवळपास युक्तिवाद पूर्णत्वास आला असून उर्वरित कामकाजासाठी गुरुवार (ता.१६) रोजी पुढील कामकाज होणार आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

BHR Scam
Jalgaon News : पिंप्राळ्यात उभे राहतेय ‘मॉडेल’ अग्निशमन केंद्र; 1 कोटी शासनाचा निधी

खंडणी देण्यास भाग पाडले

फिर्यादीचे वकील सागर चित्रे यांनी बचावपक्षाचे मुद्दे खोडून काढताना विशेष सरकारी अभियोक्ता पदावर असनस्थ व्यक्ती, कायद्याचा जाणकार यांच्याकडून झालेला गुन्हा हा व्हाइट कॉलर क्राईम या प्रकारात मोडत असून उर्वरित देाघांना हाताशी धरून त्यांनी गुन्हा घडवून आणला आहे.

फिर्यादी सूरज झवरचे वडील जेलमध्ये असताना व तो स्वतःजेल मधून सुटून आला असल्याने त्याला आणखी इतर गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत कटकारस्थान रचुन नियोजनबद्धरित्या संशयितांनी गुन्हा केला आहे.

संशयितांना जामीन मंजूर केल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणण्याचा व त्याच बरोबर यंत्रणेला बाध्यकरू शकतात म्हणून जामीनाला तीव्र हरकत घेतली.

तपासात सहकार्य नाही..

BHR Scam
Jalgaon News : कर्जबाजारी दुकानदाराने उचलले टोकाचे पाऊल!

फॉरेन्सिक ऑडिटर असताना शेखर सोनाळकर यांचे काम थांबविण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी ॲड. कीर्ती पाटील यांनी तक्रारींना सुरवात केली. ॲड. कीर्ती पाटील यांनी जून- २०१८ मध्ये केंद्रीय रजिस्ट्रार यांना लेखी तक्रार दिली होती.

मुळात त्या बीएचआरच्या सदस्य सभासद किंवा भागधारक नसतांना त्यांच्याकडे संस्थेचे अत्यावश्यक दस्तऐवज आले कोठून..तर, हे सर्व दस्तऐवज सोनाळकरांनी पुरविले.

त्याच बरोबर डेक्कन पेालिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तपसाधिकारी सुचिता खोकले, फॉरेन्सिक ऑडिटर नेहा फडके यांनी न्यायालयात अहवाल सादर केल्यानंतर ॲड. चव्हाण यांनी त्यांना धमकी दिल्याचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. दरम्यान, ॲड. काबरा यांनी अंतरीम जामीनावर असलेले सोनाळकर यांचे तपासाला सहकार्य नसल्याचे न्यायालयात सांगताच ॲड. जळमकर यांनी हरकत घेतली.

BHR Scam
Jalgaon Crime News : गुन्हेशाखेकडून तीन अट्टल घरफोड्यांना अटक; पोलिस ठाण्यासमोरच घरफोडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.