जळगाव : फिर्यादी सूरज झंवर यांच्याकडून ॲड. चव्हाण यांना प्रत्यक्ष रक्कमच दिली गेलेली नाही. सोनाळकर त्यांच्या सोबत असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही., असा युक्तिवाद आज (ता.१०) जिल्हा न्यायालयात बचाव पक्षातर्फे मांडण्यात आला. (bhr extortion case Plaintiff did not pay actual amount to Adv Chavan argument by defense in district court jalgaon news)
बीएचआर खंडणी प्रकरणात जिल्हा न्यायालयात न्या. जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात कामकाज होऊन बचाव पक्षातर्फे तपासधिकार्यांच्या ‘से’ वर तब्बल तीन तास सलग युक्तिवाद करण्यात आला.
बीएचआर प्रकरणात अटकेत असताना जामिनासाठी मदत करण्यासाठी व गोठवलेली बँक खाती खुली करण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता प्रवीण चव्हाण, फॉरेन्सिक ऑडिटर शेखर सोनाळकर यांनी चाळीसगाव येथील मद्यविक्रेता उदय पवार यांच्या माध्यमातून फिर्यादी सूरज सुनील झंवर यांच्याकडून एक कोटी २२ लाख रुपये खंडणी घेतल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्ह्यात शेखर सोनाळकर यांना जिल्हा न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला असून ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यावतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आलेला आहे. त्या अर्जावर न्या. जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात आज कामकाज झाले.
यात फिर्यादी सूरज झंवर यांच्या म्हणण्यानुसार व दाखल गुन्ह्यात नमुद केल्याप्रमाणे ॲड.चव्हाण आणि सोनाळकर यांच्याशी फिर्यादीची प्रत्यक्ष भेट झालेली नाही. खंडणीची प्रथम मागणीचा निरोप ॲड. चव्हाण यांचे ज्युनिअर ॲड. मोहित माहिमतुरा यांच्याकडून (११ जून ०२१) खंडणीसाठी धमकावण्यात आले असे सांगण्यात आले.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
वास्तविक ॲड. चव्हाण यांनी खंडपीठात सुनील झंवर यांच्या जामिनास कडाडून विरोध केला होता. जर त्यांना खंडणीच घ्यायची असती तर त्यांनी तसे केले नसते. दरम्यान २० नोव्हेंबर ०२१ रोजी फिर्यादी चाळीसगाव येथे जाऊन उदय पवार यांची भेट घेतो.
तेव्हा पवार यांच्या सोबत जातांना त्यांच्या बुलेट दुचाकीचा नंबर काय, ज्या वाहनात फिर्यादी होता त्या कारचा नंबर कोणता, असे काहीच तक्रारीत नमूद नाही.
उदय पवार यांच्याशी झालेली बोलणीच्या तारखा व खंडणी घेतल्याच्या तारखांना फिर्यादी ॲड.चव्हाण यांना भेटलेलेच नाही. अर्थात फिर्यादीच्या म्हणण्या नुसार पहिला निरोप ज्युनिअर वकील माहिमतुरा यांनी दिला. उदय पवार यांच्या घरी जाऊन पैसे दिले तेव्हा पवार यांच्या मोबाईलद्वारे सिंग्नल ॲपच्या माध्यमातून ॲड. चव्हाण यांच्याशी व सोनाळकरांशी बोलणे झाले.
तक्रारीत नमूद हा सर्व घटनाक्रम पाहता नोंदवलेल्या काळात १५ ते २६ नोव्हेंबर शेखर सोनाळकर नागपूर येथे अेसीबी कार्यालयाच्याच शेजारील दालनात डॉ. संतोष आंबेकर यांच्या प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट करत होते.
तसे पुरावे, ऑनलाइन तिकीट आणि नोंदी न्यायालयात सादर करण्यात आल्यात. खूप उशिरा तक्रार दाखल झालेली असून ती आफ्टर थॉट विचारांती पुरावे तयार करून केली असल्याचा युक्तिवाद ॲड.जळमकर यांनी केला.
रुग्णालयातून सोनाळकर न्यायालयात
लेखा परिक्षक आणि खंडणीच्या गुन्ह्यात संशयित शेखर सोनाळकर यांच्यावर दोन शस्त्रक्रिया नुकत्याच झाल्या असून त्यांना माईल्ड स्ट्रेाक आल्याने ते गाजरे रुग्णालयात उपचारार्थ दाखल होते. आज जामीन अर्जावर कामकाज असल्याने ते व्हीलचेअरवरून जिल्हा न्यायालयात कामकाजासाठी हजर होते.
ॲड. सुरेंद्र काबरा सरकारपक्षातर्फे, ॲड.सागर चित्रे, पंकज पाटील फिर्यादीतर्फे तर ॲड.गोपाल जळमकर यांनी बचाव पक्षातर्फे बाजू मांडत आहे. उर्वरित कामकाजासाठी न्यायालयाने सोमवार (ता.१३) ची तारीख दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.