BHR Extortion Case : सूरज तेजसच्या मैत्रीने उघडे पाडले खंडणीचे सिंडिकेट

BHR Scam
BHR Scamesakal
Updated on

जळगाव : विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासाठी एक कोटी २२ लाख रुपयांची खंडणी (Extortion) उकळल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयितांच्या जामीन अर्जावर काम सुरू असून, तक्रारदारांनी सादर केलेल्या पुराव्यांना अनुसरून न्यायालयात सरकार पक्षाने आपली बाजू भक्कमपणे मांडली आहे. (BHR extortion case Suraj friendship with Tejas express crime syndicate jalgaon news)

सूरज झंवर कोठडीत असताना ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याशी ओळख असलेला तेजस कोठडीत आला अन्‌ सूरज-तेजसच्या मैत्रीतून गुन्हेगारीचे ‘सिंडिकेट’ उघडकीस आले असून, तेच तपासाधिकारी व सरकार पक्षाने मांडण्याचा प्रयत्न केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

जळगाव घरकुल प्रकरणासह महाराष्ट्रातील बहुतांश ‘हाय प्रोफाइल’ गुन्हे आणि न्यायालयीन खटल्यांसाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. प्रवीण चव्हाण यांनी काम पाहिले. जळगाव घरकुल प्रकरणाने त्यांना प्रकाशझोतात आणले. आमदार सुरेशदादा जैन, डीएसकेचे कुळकर्णी, बीएचआरचे प्रमोद ऊर्फ अंकल रायसोनी यांच्यासह हाय प्रोफाइल खटल्यात त्यांच्या धाडसाचे आणि कायद्यातील प्रामाणिक प्रावीण्याचे गोडवे राज्यभर गायले जात होते.

‘बीएचआर-२’चा अंक
अशातच ‘बीएचआर-२’ला सुरवात झाली. अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या कार्यकाळात कर्जाच्या परतफेडीत ठेव पावत्या देऊन कर्जाची फेड करण्यात आली. बीएचआर संस्थेच्या मालमत्तांची बेकायदेशीर खरेदी-विक्रीच्या आरोपात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. या गुन्ह्यात अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, सूरज झंवर व इतरांना अटक झाली.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

BHR Scam
Jalgaon News : अपघातात जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

सुनील झंवर मिळून आले नाहीत, म्हणून तपास पथकाने त्यांचा मुलगा सूरज झंवर याला २२ जानेवारी २०२१ ला अटक केली. त्यानंतर जितेंद्र कंडारे, सुनील झंवर यांनाही अटक केली. ॲड. चव्हाण आणि शेखर सोनाळकर यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना बचाव व सरकार पक्षातर्फे खालील मुद्द्यांवर म्हणणे मांडण्यात आले.

धमकीवजा निरोप
सुनील झंवर यांच्या श्री साई मार्केटिंग ॲण्ड ट्रेडिंग कंपनी प्रा. लि. कंपनीत कुठलाही अधिकृत भागीदारी नसताना व स्वतःची वेगळी फर्म (युगश्री जयसाई वेअर हाऊस, श्री साईबाबा कोल्ड स्टोरेज)चा व्याप सांभाळत असताना, तत्कालीन तपासाधिकाऱ्यांनी दबावतंत्राचा वापर करत अटक केली.

पाच महिन्यांनंतर २८ मे २०२१ ला सूरज झंवर यांची जामिनावर मुक्तता झाली. सुरवातीपासून या गुन्ह्याचे काम ॲड. प्रवीण चव्हाण पाहत होते. परिणामी, जामिनावर सुटताना ॲड. चव्हाण यांचा ज्युनिअर मोहित माहिमतुरा याने सूरजला ‘तुझ्या वडिलांची आता ४-५ वर्षे वाट लागली, तुला काय पूर्तता करायचीय ती करून टाक’, असा धमकीवजा निरोप दिला.

BHR Scam
Jalgaon News : खंडणीप्रकरणी सरपंचाची शिक्षा अपिलात रद्द

मद्य व्यावसायिकाची ‘एन्ट्री’
तक्रारदार सूरज जामिनावर मुक्त झाल्यावर वडिलांसाठी प्रयत्न करीत असताना, २० नोव्हेंबर २०२१ ला उदय नानाभाऊ पवार यांची या प्रकरणात एन्ट्री होऊन त्यांनी त्यांच्या मोबाईलद्वारे सिग्नल ॲपद्वारे बोलणे करवून दिले.

तेव्हा ॲड. चव्हाण म्हणाले, ‘‘माझ्यासोबत शेखर सोनाळकर आहेत. तुझ्या वडिलांना जामिनावर लवकर सोडवायचे असल्यास व गोठवलेली बँक खाती मुक्त करावयाची असल्यास दोन कोटी रुपयांची व्यवस्था कर. नाही तर तुझ्या वडिलांची ५-६ वर्षे वाट लागीच म्हणून समज’, अशा प्रकारात तडजोड होऊन कोथरूड येथील गुन्ह्यात सूरज याला अटक न करणे आणि जामिनासाठी सर्वतोपरी मदत (न्यायालयात) करण्यासाठी एक कोटी २२ लाखांत सौदा ठरला.

विधानसभेत पेनड्राइव्ह भूकंप
राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२२ ला विधानसभेत ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातील चित्रीकरण आणि संभाषण असलेला टेप असलेला पेनड्राइव्ह सादर करून रान उठविले. चव्हाण यांच्या ओळखीचा तेजस मोरे याने ॲड. चव्हाण यांच्या दालनात लावलेल्या घड्याळ कॅमेरातून स्टिंग ऑपरेशन करून खळबळ उडवून दिली.

BHR Scam
Jalgaon News : महामार्गाच्या दुर्दशेबाबत राष्ट्रवादीचा ‘एल्गार’


येरवाडात गवसला सुटकेचा धागा
बीएचआर ठेव पावत्या-मालमत्ता खरेदी प्रकरणात निष्पक्ष बाजू न्यायालयात सिद्ध करण्यासाठी कागदोपत्री दस्तऐवजांसह स्टिंग ऑपरेशनमधून सरकारी वकिलांना उघडे पाडण्याचा महत्त्वपूर्ण दुवा याच कारागृहात गवसला. ॲड. प्रवीण चव्हाण यांना पूर्वीपासूनच ओळखत असलेला तेजस मोरे येरवाडा कारागृहातील सूरज झंवर याच्या बॅरेकमध्ये आला. जळगावशी निगडित असल्याने त्याच्याशी ओळख झाली.

या ओळखीतच माहितीची देवाण-घेवाण होऊन तेजस मोरे याने सूरजला मदतीचा निर्णय घेतला. ॲड. चव्हाण यांच्या कार्यालयातील घड्याळाचे स्टिंग ऑपरेशन आणि सूरजने उदय पवार यांना दिलेल्या एक कोट २२ लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणाचे सर्व पुरावे, व्हिडिओ, ऑडिओ शूटींग, तांत्रिक पुरावे न्यायालयात सादर केले आहेत.

BHR Scam
Jalgaon News : भगवा चौकात CCTV ची नजर; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लोकसहभागातून सुविधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.