हा निकाल महाविकास आघाडीचे नेते एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरींना मोठा धक्का मानला जात आहे.
जळगाव : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल लागला आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये काहींनी आपली सत्ता राखलीये. तर, काही बाजार समित्यांमध्ये मातब्बर नेत्यांचा बाजार उठला आहे.
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल (Bhusawal Market Committee Result) नुकताच जाहीर झाला. यात भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ताब्यातून सत्ता आपल्याकडं ओढून घेतली. भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल विरूध्द महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलमध्ये तगडी लढत झाली.
यात आमदार संजय सावकारे यांनी भाजपच्या (BJP) पॅनलचं तर आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) व माजी आमदार संतोष चौधरी यांनी मविआच्या पॅनलचं नेतृत्व केलं. भुसावळ बाजार समितीत याआधी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती.
मात्र, यावेळी भाजप आमदार संजय सावकारे यांनी कडवी झुंज दिली. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलनं 18 पैकी 15 जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली. दुसरीकडं महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनलला केवळ तीन जागांवर यश मिळालंय. हा निकाल महाविकास आघाडीचे नेते एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरींना मोठा धक्का मानला जात आहे. या निकालामुळं भुसावळचं राजकारण बदलणार असल्यातंही बोललं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.