Jalgaon News : जलवाहिनी खोदताना पडले भगदाड; कजगावात भुयारी मार्गाच्या चर्चेला उधाण

A tunnel-like pit in Junegaon.
A tunnel-like pit in Junegaon. esakal
Updated on

Jalgaon News : येथे जुन्या गावातील मुख्य रस्त्यालगत जलवाहिनीवरून कनेक्शन घेण्यासाठी जेसीबीने खोदकाम सुरू असताना भगदाड पडले. मात्र तो भुयारीमार्ग असावा यांसह वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. प्रशासनाने या ठिकाणी संशोधन करण्याची मागणी होत आहे.

येथील जुन्या गावातील राणा पॉइंटकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून जलवाहिनी गेली आहे. तिच्यावरून नळकनेक्शन घेण्यासाठी भावडू धैर्यशील पाटील यांनी खड्डा खोदायला सुरवात केली. (big pit occurred when JCB is digging for connection from water pipeline jalgaon )

खड्डा एक ते दीड फूट खोदताच या ठिकाणी जवळपास २५ ते ३० फुटाचे मोठे भगदाड पडले. हे पाहून सारेच आश्‍चर्यचकित झाले. हे भगदाड निरखून बघितले असता दोन भुयारी मार्गसदृश दिसत होते. या घटनेची चर्चा गावात पसरताच बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

भुयारी मार्गाची चर्चा...

जुन्या जाणकारांच्या मते कजगाव येथील गढीवरती पिरबाबाचे स्थान असून, या स्थानावर जाण्यासाठी भुयारी मार्ग होता. या मार्गावरून कजगावच्या पिरबाबाच्या स्थानावरून या भुयारी मार्गातून सवाऱ्या निघत होत्या. या सवाऱ्या लोणपीराचे येथे जात होत्या.

गोंडगाव येथेही हा भुयारी मार्ग गेलेला असल्याची माहिती तसेच मराठवाड्यातील गोपावडी किल्ल्यावरून देखील हा भुयारी मार्ग कजगावच्या गढीवरील पिरबाबाच्या स्थानापर्यंत आल्याची माहिती जुने जाणकार देतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A tunnel-like pit in Junegaon.
Jalgaon Banana Crop : वरखेडेची केळी थेट सौदी अरेबियात! 200 क्विंटल शेतमाल रवाना

यातील सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे. या अगोदरदेखील अशा पद्धतीने न खोदताच काही ठिकाणी भगदाड पडले आहे. या खड्ड्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. कजगाव ग्रामपंचायतीने या घटनेबाबत तहसीलदारांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली.

ग्रामपंचायतीची तत्परता...

कजगाव येथील जुन्या गावात अचानक भुयारीसदृश मार्ग प्रकार उघडकीस आल्यानंतर या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने कोणतीही हानी झाली नसली तरी नेमका हा प्रकार काय आहे? यासाठी तहसीलदारांना ग्रामपंचायतीने काय उपाययोजना करता येतील, अशी विचारणा केली असता खड्डा बुजविण्यास सांगितले.

परंतु यासाठी वाळू किंवा मुरूम, दगडांची आवश्यकता आहे, असे अनिल महाजन व माजी सरपंच मनोज धाडिवाल यांनी तहसीलदारांना सांगितले. परंतु त्यांनी परवानगी देण्यातस नकार दिला. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला अडचण निर्माण झाली.

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जेसीबीच्या या ठिकाणी तात्पुरता खड्डा कोरून बाहेरून माती, दगड आणून बुजविला. वेळीच उपाययोजना केली म्हणून नागरिकांचा जीव भांड्यात पडला. मात्र नागरिकांनी महसूल विभागाविषयी नाराजी व्यक्त केली.

A tunnel-like pit in Junegaon.
Jalgaon News : तृणधान्यातून सकस आहार घेण्याचे विद्यार्थ्यांना धडे; कृषी विभागाचा पुढाकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.