जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांमध्ये आलबेल असल्याचं चित्र आहे.
सध्या अनेक कारणांमुळे राज्याचं राजकीय वातावरण तापंल आहे. अगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. ओबीसी आरक्षणामुळे अनेक नेत्यांची नाराजी असली तर निवडणुकांसाठी सर्वांनी कंबर कसली असल्याते चित्र सध्या दिसत आहे. या सगळ्यात मात्र जळगाव जिल्ह्यातून आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. आगामी निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यात शिवसेना व भाजपची युती असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगरात येवून सेनेचे आमदार चंद्रकात पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गिरीश महाजन व आमदार चंद्रकात पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली असल्याने आता राजकीय वातावरणात चर्चा सुरु आहेत. आगामी काळात खडसेंना पराभूत करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून सेनेचे आमदार चंद्रकात पाटील यांना हाताशी धरुन काही रणनिती आखली जात नाहीये ना? असे तर्क लावले जात आहेत. राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांमध्ये आलबेल असल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांचे मुक्ताईनगरातील दोन नेते म्हणजेच एकनाथ खडसे आणि सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील वितुष्ट हे सर्वश्रूत आहे.
नेमकी दोघांमध्ये काय चर्चा झाली तसेच भेटीचा तपशील कळू शकलेला नाही. मात्र, दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तविले जात आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणूकांमध्ये खडसेंना शह देण्यासाठी किंवा पराभूत करण्यासाठी गिरीश महाजन यांनी अचुक टायमिंग साधत सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यात सेना व भाजप हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर टिपण्णी व आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात भाजपचे नेते गिरीश महाजन व सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील ही भेट म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आगामी काळात भाजप सेनेच्य युतीचे तर संकेत नाहीत ना असेही प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीची सत्ता असतांना बोदवड नगरपंचायत निवडणुकीत सेनेने भाजपसोबत छुपी युती केल्याचा आरोप केला होता. खडसेंचे कट्टर वैरी भाजपचे गिरीश महाजन यांनी सेनेला बोदवड नगरपंचायत निवडणुकीत पाठींबा दिल्याने आ. चंद्रकात पाटील व एकनाथ खडसे यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. तेव्हापासून आमदार पाटील व खडसे यांच्यात आजतागायत आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू आहेत. बोदवड नगरपंचायत निवडणुकीचे उदाहरण डोळयासमोर ठेवून खडसेंनी सातत्याने अनेकदा कार्यक्रमांमध्ये आणि पत्रकारांशी बोलताना भाजप-सेनेच्या छुप्या युतीचा आरोप केला होता. अशातच सोमवारी मुक्ताईनगरात थेट भाजपचे नेते आ. गिरीश महाजन यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. यादरम्यान दोघांमध्ये बंदद्वार चर्चाही झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.