Jalgaon BJP News : ‘इलेक्शन मोड’वरील भाजपने बदलले जिल्हाध्यक्ष

Ujwala Bendale, Amol Jawle, Dyaneshwar Maharaj Jalkekar new district president of bjp jalgaon
Ujwala Bendale, Amol Jawle, Dyaneshwar Maharaj Jalkekar new district president of bjp jalgaon esakal
Updated on

Jalgaon BJP News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर ‘इलेक्शन मोड’वर असलेल्या भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्ष बदलले आहेत.

नव्या रचनेत लोकसभा क्षेत्रनिहाय रावेर ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून अमोल जावळे, जळगाव ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर, तर जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे उज्वला बेंडाळे यांच्याकडे सोपविली आहेत. (BJP has replaced district president jalgaon news)

नव्या जिल्हाध्यक्षांच्या नावांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (ता. १९) घोषणा केली. त्यानुसार नवीन पदाधिकारी तातडीने आपल्या पदाची सूत्रे हाती घेतील. आगामी निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.

दोन महिन्यांपासून प्रतीक्षा

गेल्या मे महिन्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व जिल्ह्याचे प्रभारी जळगावात आले होते. त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेत जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखतही घेतल्या होत्या. तेव्हापासूनच नवीन जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीची प्रतीक्षा होती.

नव्या रचनेत तीन अध्यक्ष

येणारा काळ निवडणुकांचा असून, त्यादृष्टीने भाजपनेही तयारी सुरू केली आहे. जळगाव जिल्ह्यात येणाऱ्या काळात सर्व नगरपालिका, जळगाव महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकाही होऊ घातल्या आहेत.

पाठोपाठ लोकसभा व पुढे विधानसभा निवडणूकही होईल. त्यादृष्टीने भाजपने तयारी म्हणून नेहमीच्या रचनेत बदल करत या वेळी दोनऐवजी तीन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ujwala Bendale, Amol Jawle, Dyaneshwar Maharaj Jalkekar new district president of bjp jalgaon
Dhule BJP News : शहर-जिल्हाध्यक्षपदी अंपळकर; भाजपकडून नियुक्ती

जावळे, जळकेकरांसह बेंडाळेंकडे जबाबदारी

नव्या रचनेत शिवसेनेच्या धर्तीवर भाजपने लोकसभा क्षेत्रनिहाय दोन जिल्हाध्यक्ष व जळगाव महानगरासाठी स्वतंत्र अध्यक्ष दिला आहे. रावेर ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून अमोल जावळे, जळगाव ग्रामीणची जबाबदारी ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर, तर जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून उज्ज्वला बेंडाळे यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे.

असे आहेत नवे अध्यक्ष

अमोल जावळे : यावल तालुक्यातील भालोद गावाचे रहिवासी. माजी खासदार व आमदार (कै.) हरिभाऊ जावळे यांचे पुत्र. अनेक वर्षांपासून भाजपत सक्रिय. हरिभाऊंच्या निधनानंतर त्यांच्याकडे यावल व रावेर तालुक्याची जबाबदारी. रावेर विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणूनही त्यांच्यावर दायित्व आहे.

ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर : जळगाव तालुक्यातील जळके गावातील रहिवासी. भाजपमध्ये यापूर्वी उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. भाजपत प्रवेशापूर्वी ते शिवसेनेत उपजिल्हा प्रमुख म्हणून काम पाहत होते. आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व असलेल्या ज्ञानेश्‍वर महाराजांचा जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात चांगला संपर्क आहे.

उज्वला बेंडाळे : जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरातील रहिवासी. प्रभाग १२ मधून त्या भाजपच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांची ही दुसरी टर्म आहे. भाजप महिला आघाडीतही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या रूपाने जळगाव महानगराला पहिल्यांदाच महिलाध्यक्ष लाभले आहेत.

Ujwala Bendale, Amol Jawle, Dyaneshwar Maharaj Jalkekar new district president of bjp jalgaon
Jalgaon Rain Alert : जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा जिल्हा प्रशासनाचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.