Jalgaon News : एकनाथ खडसे यांच्या जप्त मालमत्तेवर बोझा : आमदार मंगेश चव्हाण

माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी सातोड (ता.मुक्ताईनगर) शिवारात अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या.
Eknath Khadse
Eknath Khadse esakal
Updated on

Jalgaon News : माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी सातोड (ता.मुक्ताईनगर) शिवारात अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.

त्यावर आता बोझा बसविण्याची कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. (bjp MLA Mangesh Chavan statement on seized property of Eknath Khadse jalgaon political news)

भारतीय जनता पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारातील गट क्रमांक २२५/२मधे एक लाख अठरा हजार २०२ ब्रास अतिरिक्त अवैधरीत्या उत्खनन केले.

स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्याला आक्षेप घेऊन एसआयटी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार त्याची चौकशी होऊन १कोटी ३७ लाख १४हजार ८८२ रूपयाची दंडाची कारवाई त्यांच्यावर झाली.

या प्रकरणी त्यांच्या सर्व मिळकतीवर बोझे बसायला पाहिजे होते, मात्र एकनाथ खडसे यांच्या वैयक्तीक ४९ कोटी १लाख १४ हजार २८७ कोटीच्या मालमत्तेवर इतर अधिकाराचा बोजा बसविण्यात येत आहे.

तर त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर २२ कोटी १२लाख ८६ हजार ६५०, रोहिणी खडसे याच्यावर १० लाख ८२हजार ६६९ तर इतरांवर ६६ कोटी ४० लाख १४हजार ३२० असे एकूण १३७ कोटी १४लाख ८१हजार ८३९ रुपयांची शासनाची दिशाभूल करून पैसा कमविला त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असा आरोपही केला.

Eknath Khadse
Jalgaon News : कर्जमाफीच्या संदेशापासून ग्राहकांनी सावध राहावे; ‘RBI’चे नागरिकांना आवाहन

ते म्हणाले खडसे यांच्या मालमत्तेवर बोझा बसविण्याची आम्ही मागणी केली होती, त्यानुसार त्यांच्या केवळ दहा टक्के मालमत्तेवर बोझा बसविण्यात आला.

त्यांच्या पूर्ण मालमत्तेवर बोझा बसविण्याची कारवाई करावी यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. यासंदर्भात अन्याय झाल्याची तक्रार करीत ते न्यायालयात गेले होते. मात्र न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही.

खडसे महसूल मंत्री होते त्यांना नियमांची माहिती आहे, त्या आधारावर त्यांनी ही फसवणूक केली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दूध संघ होता, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अध्यक्ष होत्या.

त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या गैरव्यवहाराची तक्रारही पोलीसात दाखल केली आहे. त्या प्रकरणीही कारवाईबाबत पाठपुरावा करणार आहोत. त्यातही त्यांना शिक्षा व दंडात्मक कारवाई होणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

Eknath Khadse
Jalgaon Election News : अत्याधुनिक तंत्रामुळे ‘इव्हीएम’ हॅक होऊ शकत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.