Jalgaon News: राष्ट्रवादीतर्फे मंत्री महाजनांच्या प्रतिमेला काळे फासले; खडसे- महाजनांचा शाब्दिक वाद रस्त्यावर

black ink thrown on Minister Mahajan poster by ncp jalgaon news
black ink thrown on Minister Mahajan poster by ncp jalgaon news
Updated on

Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस प्रतिमेस काळ फासून व जोडे मारण्यात आले. आमदार एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा या वेळी निषेध करण्यात आला. (black ink thrown on Minister Mahajan poster by ncp jalgaon news)

माजी मंत्री एकनाथ खडसे व विद्यमान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यातील शाब्दिक वाद आता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रस्त्यावर आला आहे.

शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ‘नाथाभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘गिरीश महाजन हाय... हाय...’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस काळे फासून जोडे मारण्यात आले. खडसे यांनी दिलेले आव्हान महाजन यांनी स्वीकारावे, असे आवाहनही कार्यकर्त्यांनी केले.

black ink thrown on Minister Mahajan poster by ncp jalgaon news
Eknath Khadse: फडणवीसांनी शब्द पाळण्यासह महाजनांनी... एकनाथ खडसेंचे मराठा आरक्षणावर विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, सामाजिक न्याय महानगराध्यक्ष रमेश बाऱ्हे, सुनील माळी, राजू मोरे, किरण राजपूत, भाऊराव इंगळे, मनोहर कोचुरे, डॉ. संग्राम सूर्यवंशी, डॉ. राहुल उदासी, हितेश जावळे, आकाश हिवाळे, गणेश पाटील, पंकज तनपुरे, योगेश साळी, सुहास चौधरी, राजा मिर्झा, बशीर शहा, फैज खाटिक, नईम खाटिक, रहीम तडवी, मुश्ताक खाटिक, खलील खाटिक, फैज शहा, मतीन सय्यद, अकबर पठाण, राहुल टोके, हारून शेख, अखिल शेख आदी उपस्थित होते.

black ink thrown on Minister Mahajan poster by ncp jalgaon news
Girish Mahajan: खडसेंनी टीका करण्यापेक्षा घ्यावी तब्येतीची काळजी; गिरीश महाजन यांचा टोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.