Jalgaon Crime: काळ्याबाजारात जाणारा रेशनचा गहू, तांदूळ जप्त; दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Crime
Crimeesakal
Updated on

Jalgaon Crime : तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसीमध्ये रेशनचा गहू, तांदूळ खरेदी करून काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यावर पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकून ट्रकसह तांदूळ, गव्हाच्या गोण्या असा एकूण ९ लाख ३९ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. (Black marketed ration wheat rice seized case registered against two traders Jalgaon Crime)

तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसीतील लक्ष्मी फूड प्रोसेसरमध्ये व्यापारी अथर्व प्रदीप डेरे (वय २२) हा रेशनचा तांदूळ आणि गहू खरेदी करून काळ्या बाजारात विक्री करण्याच्या प्रयत्नांत असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर यांना मिळाल्यावरून त्यांनी पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील, पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, प्रकाश चव्हाण, भटूसिंग तोमर, प्रमोद बागडे यांना बोलावून छापा टाकण्यास सांगितले.

दरम्यान, सोमवारी (ता.२८) दुपारी पोलिसांनी छापा टाकला असता ट्रक (एमएच ०४, जेयू ८८४७ खाली करत असताना दिसून आल्याने पुरवठा निरीक्षक संतोष बावणे यांना पंचनाम्यासाठी बोलावण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime
Jalgaon Crime: भावना लोढासह 5 अट्टल गुन्हेगारांची हद्दपारी; चोऱ्या- घरफोड्यांसह भामटेगिरीत महिलेची गँग अव्वल

त्यावेळी गाडीमध्ये ३ लाख ९४ हजार रुपये किमतीच्या १९७ गोण्या, त्यावर छत्तीसगड राज्य सहकारी विपणन संघ, तर ४५ हजार रुपये किमतीच्या ४५ गोण्या त्यावर मध्यप्रदेश स्टेट सिव्हिल सपल्लाइज कार्पोरेशन असे नाव व लोगो छापलेले दिसून आले.

पोलिसांनी या गोण्या आणि ५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ९ लाख ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महसूल विभागाच्या अहवालावरून भटूसिंग तोमर यांच्या फिर्यादीवरून अथर्व प्रदीप डेरे (वय २२, रा. पवन चौक ,१२ नंबर शाळेसमोर, अमळनेर) व किशोर वासुदेव पाटील (वय ४२, रा. मजरेहोळ, ता. चोपडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime
Solapur Crime : वास्तुशांतीला गेल्यावर घरफोडी; घरात प्रवेश करून बेडरूममधील...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.