Jalgaon News: वायरमन परवान्यासाठी तरूणांची होतेय अडवणूक; राज्यभरातील सुशिक्षित बेरोजगार संतप्त

Chembur Office
Chembur Officeesakal
Updated on

Jalgaon News : वायरमन पर्यवेक्षक परवाना देण्यासाठी मुंबईतील चेंबूर स्थित कार्यालयात राज्यभरातील तरुणांची अडवणूक केली जात आहे. दर तीन वर्षांनी या परवान्यांचे नूतनीकरण करणे गरजेचे असते.

या नुतनीकरणासाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप बेरोजगार युवक संघटनेसह तरुण ठेकेदारांनी केला आहे.

चेंबूर येथील अनुज्ञापक मंडळ आणि उद्धवाहन निरीक्षक मुंबई येथे आठ वर्षांपासून कार्यरत असलेले अतिरिक्त विभाग प्रमुख अभिजीत कस्तुरे हे या संदर्भात कारणीभूत असल्याचा आरोप बेरोजगार तरुणांनी केला आहे. (Blockade of youth for wireman license chembur office Educated unemployed angry across state Jalgaon News)

अनुज्ञापक मंडळ व उद्धवाहन निरीक्षक कार्यालयामार्फत राज्यभर वायरमन सुपरवायझर परवाना दिला जातो. विद्युत क्षेत्रातील कामे करण्यासाठी बेरोजगार युवकांना हा परवाना आवश्यक असतो.

उदवाहन (लिफ्ट) निरीक्षण या कार्यालयामार्फत परवान्याचे नुतनीकरण देखील केले जाते. राज्यभरातून नुतनीकरणाचे तसेच नव्या परवान्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी चेंबूर कार्यालयात पाठवले जातात. या संदर्भात दर सहा महिन्यांनी परीक्षा होते.

पैसे घेऊन या परीक्षेचा निकाल लावला जात असल्याचा आरोप बेरोजगार युवक संघटनेने केला आहे. या कार्यालयात आठ वर्षांपासून कार्यरत असलेले अतिरिक्त विद्युत निरीक्षक अभिजीत कस्तुरे उमेदवारांच्या फायली अडवत असल्याचा आरोप आहे. 

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chembur Office
Narendra Modi : पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला डावललं; मोदींचं विधान

ठेकेदार बनू पाहणाऱ्या बेरोजगार युवकांची कामे पैशांअभावी अडवली जात आहेत. या कार्यालयात दलाल सक्रिय असून येणाऱ्या युवकांना हेरुन परीक्षेत पास करुन देण्याचे आश्वासन दिले जात असल्याचा आरोप देखील या युवकांनी केला आहे.

या संदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी युवकांनी केली आहे. या संदर्भात उदवाहन (लिफ्ट) निरीक्षण कार्यालयातील मुख्य अभियंता संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

"या कार्यालयात गेलो असता परवाना काढण्यासाठी फाईली अडवल्या जात असल्याचे दिसून आले. किरकोळ तांत्रिक कारण पुढे करुन परवाने देण्यास नकार दिला जातो. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिवांनी करायला हवी." 

- संजय पाटील, बेरोजगार युवक

Chembur Office
BCCI Income Tax : जेवढा एका कंपनीचा टर्न ओव्हर नसतो तितका BCCI ने इन्कम टॅक्स भरला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.