Jalgaon News : तब्बल ३६ तासानंतर येथील माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील यांचा मृतदेह नागझिरी नाल्यातच आसराबर्डीजवळील डोहात आढळून आला.
यामुळे त्यांच्या मृत्यूला पुष्टी मिळाली असून, शुक्रवारी (ता. ७) दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे रावेर तालुक्यात पुराच्या पाण्यात बुडून मरण पावलेल्यांची संख्या ३ झाली आहे.
दरम्यान, सातपुडा पर्वतरांगांमध्ये बुधवारी (ता. ५) सायंकाळी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे तालुक्यातील जवळपास सर्वच नदी-नाल्यांना पूर आला. (body of former vice president was found after almost 36 hours jalgaon news)
या पुरात तालुक्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला. पुरात २० जनावरे वाहून गेली असून, १४५ घरांचे नुकसान झाले आहे.
येथील उपनगराध्यक्ष व रावेर शिक्षण संवर्धक संघाचे संचालक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असलेले सुधीर गोपाळ पाटील (वय ५३) हे ५ जुलैला नागझिरी नाल्याला आलेल्या पुरात वाहून बेपत्ता झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची मोटरसायकल नाल्याच्या पात्रात सापडली, पण त्यांचा मृतदेह सापडत नव्हता.
शुक्रवारी (ता. ७) सकाळी येथील पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी पोलिस दल आणि पोहणाऱ्या पथकांसह या नाल्यात आणि काठावर मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तीन जेसीबीचा वापर करूनही नाल्यात शोध घेतला जात होता. अखेर शुक्रवारी साडेदहाच्या सुमाराला याच नाल्याच्या काठावर असलेल्या आसराबर्डी या टेकडीजवळील डोहात मृतदेह तरंगताना आढळून आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तातडीने मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येऊन शवविच्छेदन करण्यात आले आणि दुपारी त्यांचे सासरे भागवत पाटील यांच्या रावेर -अजंदा रस्त्यावरील शेतात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुधीर पाटील यांचा मुलगा यश याने मुखाने दिला. या वेळी सुधीर पाटील यांचे वडील गोपाळ पाटील यांच्यासह सर्वच नातेवाईक उपस्थित होते.
शवविच्छेदन झाल्यावर सुधीर पाटील यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार जुना सावदा रस्त्यावरील त्यांच्या जुन्या घरीही नेण्यात आले. त्यावेळी तिथे त्यांनी पाळलेल्या जर्मन शेफर्ड जातीच्या शेरू या कुत्र्याने मृतदेहाकडे धाव घेतली. २ दिवसांपासून मालक दिसत नाही म्हणून भुंकणारा हा कुत्रा मृतदेहाजवळ शांत उभा राहिला. हे दृश्य पाहून सुधीर पाटील यांच्या मित्र आणि नातेवाईकांनाही डोळ्यातून अश्रू आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.