Jalgoan News : शेतातील विहिरीत आढळला बेपत्ता युवतीचा मृतदेह

Death News
Death Newsesakal
Updated on

Jalgoan News : वडगाव (ता. रावेर) येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय बेपत्ता युवतीचा मृतदेह शहरानजीकच्या एका शेतातील विहिरीत आढळून आला आहे. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तिने आत्महत्या केली का याबाबत कारण स्पष्ट झाले नाही. (body of missing girl was found in a well in field jalgaon news)

वडगाव येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारी युवती शीतल मुकेश वाघोदे (वय १९) ही बुधवारी (ता.२८) कॉलेजला रावेरला जात असल्याचे सांगून घरातून गेली होती. त्यानंतर ती घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला व निंभोरा पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती.

तालुक्यातील अजंदा रस्त्याने एका शेतात शेतमजुरी काम करणाऱ्या महिलांना प्रकाश मानकर यांच्या शेतात असलेल्या विहिरीजवळ शाळेची बॅग व चप्पल आढळून आली. बॅगची तपासणी केली असता ती वडगावची असल्याचे निष्पन्न झाले. रावेर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन विहिरीत शोध घेतला. परंतु ती आढळून आली नाही.

तीस तासाच्या प्रतीक्षानंतर आज पुन्हा शोध सुरू केला. तब्बल तीस तासानंतर शीतल वाघोदे हिचा मृतदेह २०० फूट खोल विहिरीमधून बाहेर काढण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Nagpur Crime: बापरे! काय झाले या मुलांना? 'सॉरी' न म्हटल्याने चाकूने सपासप वार करून एका तरुणाची हत्या

या वेळी पोलिस निरीक्षक कैलास नागरे, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले, पोलिस नाईक सुनील वंजारी, पोलिस अंमलदार सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. शवविच्छेदनानंतर तिचा घातपात झाला नाही, हे स्पष्ट झाले आहे.

मात्र रावेर - अजंदा रस्त्यापासून एक किलोमीटर दूर शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आल्याने तिने आत्महत्या केली का? याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळाली नाही. पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव तपास करीत आहेत.

Death News
Crime: नात्याला काळीमा फासणारी घटना! चुलत्याने स्वतःच्या पुतणीचा केला विनयभंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.