Jalgaon : तालुक्याच्या ठिकाणी बूस्टर डोसची वाणवा

Rural hospital building at Raver.
Rural hospital building at Raver.esakal
Updated on

रावेर (जि. जळगाव) : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची (Corona patients) संख्या ९९ पर्यंत पोचली तरीही जिल्हा आरोग्य यंत्रणा अद्यापही कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस (Booster dose) तालुकास्तरावर उपलब्ध करून देण्याबाबत गंभीर नसल्याची बाब समोर आली आहे. बूस्टर डोस घेण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी जळगाव येथील एका खासगी दवाखान्यात यावे आणि पावणेचारशे रुपये देऊन बूस्टर डोस घ्यावा, अशी अपेक्षा ही यंत्रणा बाळगून आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता तातडीने तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालयातच (Rural hospital) ही व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे येत आहे. (Booster dose shortage at raver taluka Jalgaon news)

याबाबतची अधिक माहिती अशी, की कोरोनाच्या दोन डोसनंतर ९ महिने पूर्ण झाल्यावर बूस्टर डोस घेण्याबाबतचे संदेश (एसएमएस) नागरिकांच्या मोबाईलवर येत आहेत. या मेसेजनंतर बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिक स्थानिक ग्रामीण रुग्णालयात जात आहेत. मात्र तिथे ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांनाच बूस्टर डोस दिला जात आहे. साठ वर्षाच्या आतील स्त्री-पुरुषांना ग्रामीण रुग्णालयातून बूस्टर डोस न देता परत पाठवले जात आहे. त्यांना बूस्टर डोससाठी खासगी दवाखान्यात संपर्क साधण्यासाठी सांगितले जात आहे. साठ वर्षाच्या आतील स्त्री-पुरुषांना बूस्टर डोस दिल्यानंतर त्याची ऑनलाइन नोंद संबंधित वेबसाईटवर होत नसल्याचे आरोग्य विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

जळगावलाच बूस्टर डोस का

दरम्यान, आलेल्या एसएमएसनुसार ६० वर्षाच्या आतील नागरिकांना तालुकास्तरावर कुठल्याही खासगी दवाखान्यात कोरोनाचे बुस्टर डोस देण्याची सोय उपलब्ध नाही. ही व्यवस्था जळगाव येथील २ खासगी रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका खासगी रुग्णालयात कोविशिल्ड आणि दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात कोवॅक्सिनचा बूस्टर डोस उपलब्ध करून दिला जात आहे. त्यासाठी एका डोसला तब्बल ३८७ रुपये मोजावे लागत आहेत. काही नागरिक ही रक्कम भरूनही बूस्टर डोस घेण्यास तयार आहेत परंतु जळगावला जाऊन बूस्टर डोस घेणे यात अनेकांना अडचणी येत आहेत.

लसीकरण विभाग अद्याप सुस्तच

हातावरच पोट असलेल्यांना ३८७ रुपये देणे आणि जळगावला जाणेही शक्य नाही. दरम्यान, जिल्ह्यात हळूहळू कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या आठवड्यात ही रुग्ण संख्या ९९ पर्यंत म्हणजे १०० च्या जवळ पोहोचली आहे. बूस्टर डोस वेळेवर न मिळाल्याने नागरिकांच्या मनात कोरोनाबाबत भीती निर्माण व्हायला लागली आहे. पण तरीही लसीकरण विभाग अद्याप सुस्तच असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत आणि ग्रामीण रुग्णालयात हेलपाटे घालून कंटाळले आहेत. आता तरी आरोग्य विभागाने आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रकरणी लक्ष घालून किमान तालुका पातळीवर बूस्टर डोस ग्रामीण रुग्णालयात आणि आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालयातही उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Rural hospital building at Raver.
हिंगोणा येक्षील पाणी समस्या कायमची मिटणार

"तालुकास्तरावर कोरोनाचे बूस्टर डोस देण्यासाठी खासगी दवाखान्यांना केंद्र देऊ केले. मात्र, संपूर्ण जिल्ह्यात कोणीही ते स्वीकारले नाही; कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बदललेल्या परिस्थितीत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रत्येक तालुका स्तरावर कोरोनाचा बूस्टर डोस देण्यासाठी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येईल."

- डॉ. समाधान वाघ, जिल्हा लसीकरण अधिकारी, आरोग्य विभाग, जळगाव.

Rural hospital building at Raver.
एका नाथाच्या बंडाने दुसऱ्या नाथाच्या स्वप्नांवर फिरले पाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()