NMU Metting |परीक्षांच्या कामावरील बहिष्कार मागे घ्यावा : सहसंचालक प्रा. चव्हाण

Jalgaon: Prof. Prof. Santosh Chavan. Neighbor Chancellor Prof. V. L. Maheshwari, Registrar Prof. Dr. Vinod Patil etc
Jalgaon: Prof. Prof. Santosh Chavan. Neighbor Chancellor Prof. V. L. Maheshwari, Registrar Prof. Dr. Vinod Patil etcesakal
Updated on

जळगाव : विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षांच्या कामांवर टाकलेला बहिष्कार मागे घेऊन शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहसंचालक प्रा. संतोष चव्हाण यांनी केले.

राज्यातील अकृषी विद्यापीठीय व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी २ फेब्रुवारीपासून परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. (Boycott of examination work should be withdrawn Joint Director Prof. Chavan Discussion in meeting in NMU Jalgaon News)

Jalgaon: Prof. Prof. Santosh Chavan. Neighbor Chancellor Prof. V. L. Maheshwari, Registrar Prof. Dr. Vinod Patil etc
NMU Election Result : उमविचे प्रा. मनीष जोशी UGC सचिवपदावर

बैठकीत झाली चर्चा

यासंदर्भात शिक्षण सहसंचालक प्रा. संतोष चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. ३) विद्यापीठात ‘उमवि’ कर्मचारी संघटना व मागासवर्गीय कर्मचारी संघटना, तसेच महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, कुलसचिव डॉ. विनोद पाटील व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये व्यत्यय येऊ नये.

सर्व परीक्षा सुरळीत होऊ द्याव्यात, असे आवाहन प्रा. चव्हाण यांनी केले. त्यावर संघटनांचे प्रतिनिधी अरुण सपकाळे, दुर्योधन साळुंखे, भय्या पाटील, वैशाली वराडे, तसेच महाविद्यालयीन संघटनांचे प्रतिनिधी प्रसाद पाटील, विजय पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Jalgaon: Prof. Prof. Santosh Chavan. Neighbor Chancellor Prof. V. L. Maheshwari, Registrar Prof. Dr. Vinod Patil etc
NMU Senate Election : सिनेटच्या 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात

शासनाने प्रलंबित मागण्यांकडे गांभीर्याने बघावे व कर्मचाऱ्यांच्या भावना शासनाच्या कानावर घालाव्यात, असे आवाहन या प्रतिनिधींनी केले. तसेच राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीकडून हे आंदोलन पुकारले असल्यामुळे जो निर्णय होईल, तो राज्यपातळीवर होईल, असे या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने लक्ष द्यावे आणि विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, याकडे कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले.

Jalgaon: Prof. Prof. Santosh Chavan. Neighbor Chancellor Prof. V. L. Maheshwari, Registrar Prof. Dr. Vinod Patil etc
NMU Update : उमवि शिक्षणशास्त्र प्रशाळेत नवे प्रमाणपत्र अभ्यासक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.