Jalgaon News : निमखेडी-बांभोरीदरम्यान पूल शक्य, बंधारा नाही!

Bambhori Pull
Bambhori Pullesakal
Updated on

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरून जळगाव आणि धरणगाव तालुक्यांना जोडणाऱ्या गिरणा नदीवरील पुलास समांतर बांभोरी आणि निमखेडीदरम्यानच्या प्रस्तावित बंधारा कम पुलास कामाआधीच ‘खो’ मिळाला आहे. याठिकाणी तांत्रिकदृष्ट्या बंधारा शक्य नसल्याचा अहवाल शासनाकडे गेल्यामुळे आता या जागेवर पूल तरी होतो का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाला लागून असणाऱ्या बांभोरी- निमखेडी- जळगाव- आसोदा- भादली प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ५९ वरील ४/५०० किलोमीटरवर गिरणा नदीवर सध्याच्या पुलाला समांतर असा बंधारा कम पूल प्रस्तावित करण्यात आला. गेल्या महिन्यात राज्याच्या अर्थसंकल्पात या पुलास मंजुरीही मिळाली. (Bridge construction possible between Nimkhedi Bambhori but embankment not possible Jalgaon News)

Bambhori Pull
Jalgaon Crime Update : दहशत माजविणाऱ्याला तलवारीसह अटक

गिरणा नदीवरील महामार्गावरील पुलाला पर्याय म्हणून या प्रस्तावित पुलाची मदत होणे व या भागातील पाणीपुरवठ्याचाही प्रश्‍न सुटावा, म्हणून बंधारा कम पुलाच्या मंजुरीसाठी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी अर्थसंकल्पात ४० कोटींचा प्राथमिक निधीही मंजूर करण्यात आला होता.

पूलच शक्य

काम मंजूर होऊन महिना उलटत नाही तोच या पुलाच्या तांत्रिकदृष्ट्या योग्यतेच्या मुद्यावर खल झाला. नदीवर निमखेडी ते बांभोरीदरम्यान याआधी जुन्या महामार्गावर हा पूल होता. मात्र, त्याला बंधारा व पुलाचे स्वरूप देण्याचे ठरल्यानंतर त्यासंबंधी प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार त्याला मंजुरी मिळाली. मात्र, महिनाभरात या जागेवर पूलच शक्य आहे. त्याठिकाणी बंधारा होऊ शकत नाही, असा तांत्रिक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या या कामाला ते सुरू होण्याआधीच ‘खो’ मिळाला आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Bambhori Pull
Jalgaon Crime News : घरफोड्यांच्या गुन्ह्यातील दोघांना अटक

पूलही होणार की नाही?

सध्या राष्ट्रीय महामार्गावर बांभोरीनजीक मोठा पूल आहे. त्याला समांतर म्हणून हा बंधारा कम पूल होणार होता. वाढत्या वाहतुकीला पर्याय व पाण्याचा नवीन स्त्रोत, म्हणून त्याचे महत्त्व पटवून दिल्यानंतर तो मंजूर झाला होता. मात्र, सध्याचा पूल आणि महामार्गाच्या चौपदरीकरणात पाळधीहून बायपास गेलेल्या महामार्गावर रेल्वे पुलास समांतर पूल होत असल्याने या तिसऱ्या पुलाची गरज काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. कारण, बायपास मार्ग पुलासह पूर्ण झाल्यानंतर जळगाववगळता संपूर्ण अवजड वाहतूक पाळधीहून बायपास निघून नवीन मोठ्या पुलावरून भुसावळकडे जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या बांभोरी पुलावरील ताण आपसूकच कमी होणार असल्याने तिसऱ्या पुलाची गरज राहणार नाही, असाही मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे हा नवीन मंजूर पूल होतो की नाही? याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

"निमखेडी- बांभोरीदरम्यान गिरणा नदीवर बंधारा कम पूल प्रस्तावित केला होता. त्याला मंजुरीही मिळाली. मात्र, तांत्रिक सर्वेक्षण व पाहणीत याठिकाणी बंधारा करणे शक्य नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याठिकाणी केवळ पूलच बांधण्याचे नियोजन असून, त्यादृष्टीने नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येत आहे."

-प्रशांतकुमार येळाई, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Bambhori Pull
Jalgaon Political News : राजकीय संघर्षात नात्याची बदनामी का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.