Jalgaon News : शहरात तब्बल ७५ वर्षानंतर गिरणा नदीवर जुने मटन मार्केट ते पेठ हा पूल तयार होत आहे. या पुलामुळे मध्यवर्ती शहरातील रसातळा जाणारी बाजारपेठ फुलण्यास मदत होणार आहे. (bridge is being constructed across Girna River from Old Mutton Market to Peth jalgaon news)
शिवाय पेठ भागातील रहिवासी व शेतकरी बांधवांचा तीन किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. आश्वासनांची पूर्तता होत असल्याने मोठे समाधान असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
गिरणा नदीवर जुने मटन मार्केट ते पेठ पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विकास पाटील, सुनील देशमुख, लखीचंद पाटील, प्रतापराव पाटील, दत्तात्रय पवार, डॉ. प्रमोद पाटील, विनायक देशमुख, सुनील पाटील (जारगाव), युवराज पाटील, इम्रान अली सय्यद,
अतुल पाटील, दादाभाऊ भोई, संतोष महाजन, अतुल परदेशी, सुभाष पाटील, जग्गू भोई, प्रवीण येवले, आबा चौधरी, विजय चौधरी, बापू पाटील, श्रवण भोई, शीतल सोमवंशी, सरपंच मोहन पाटील, नाना हडपे, नागेश वाघ, पप्पू पाटील, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी डी. एम. पाटील, बांधकाम ठेकेदारासह आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
गिरणा नदीवर १९५२ मध्ये एक पूल झाला होता. आज २०२३ म्हणजे तब्बल ७५ वर्षानंतर या गिरणावर भडगाव तालुक्यात तब्बल पाच पूल होत आहेत. प्रत्येकी १५ ते १८ कोटी रुपये किमतीपर्यंतचे पाच पूल हे जवळपास १०० कोटी रुपये खर्चातून तयार होत आहेत आहे.
जुनी बाजारापेठ फुलणार
जुन्या शहराची शंभर ते सव्वाशे वर्षांपासूनची बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ पुलामुळे फुलणार असून, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तीन किलोमीटरचा फेरा कमी होण्यास मदत होणार आहे. जुन्या बाजारपेठेला गतवैभव प्राप्त होणार आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले. दरम्यान, व्यापारी वर्गासह ‘माझे गाव माझा परिसर प्रतिष्ठानच्यावतीनेही सातत्याने या पुलाची मागणी करण्यात आली होती.
भडगाव शहरात १०५ कोटींची पाणीपुरवठा योजनाही मंजूर झाली असून, अंतिम टप्पात आहे. तळणी परिसराला सुशोभीकरणासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरात ९८ खुले भूखंड विकसित करण्यासाठी जवळपास २० कोटींचा निधी आणला. आज भडगाव शहरातील शंभर टक्के खुले भूखंड विकसित होत आहेत, असे आमदार पाटील यांनी सांगितले. आबा महाजन यांनी सूत्रसंचालन केले.
असा असेल पूल
जुने मटन ते पेठ (गावठाण) या पुलासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरत्थान महाभियानातून २२ कोटी ६० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. पुलाची लांबी २१० मीटर असून, पुलावर १५ मीटर लांबीचे १४ गाळे आहेत. साडेसात मीटर रुंदी या पुलाची रस्त्याची असणार आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस २०५ मीटर लांबीचा जोड रस्ता असणार आहे. आणि १७० मीटर लांबीची संरक्षकभिंत या दोघेही बाजूने या ठिकाणी असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.