Jalgaon News : तुटका दरवाजा, जीर्ण टायर, कसा करणार गुन्ह्यांचा बिमोड?

Bhusawal: A damaged vehicle of Market Police Station.
Bhusawal: A damaged vehicle of Market Police Station.esakal
Updated on

Jalgaon News : शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्याची हद्द सर्वात मोठी आहे. तसेच दैनंदिन घडामोडी व गुन्ह्याचे प्रमाणही अधिक आहे. जर एखादी घटना घडली तर घटनास्थळी वेळेवर पोहोचण्यासाठी वाहन आवश्यक आहे.

मात्र, येथील बाजारपेठ पोलिस ठाण्याची दैना झाली असून, तुटलेला दरवाजा अन् घासलेले टायर्स अपघाताला आमंत्रण देत आहेत. (Broken door worn tire How to solve crimes Bhusawal market is inviting accidents by police vehicles Jalgaon Crime News)

त्यामुळे पोलिस ठाण्याचे कर्मचारी जुनेच निक्रिय वाहन वापरून गुन्हेगारीचा बिमोड करणार तरी कसा? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे बाजारपेठ पोलिस ठाण्याला नवीन सरकारी वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

शहरातील बाजारपेठ पोलिस ठाणे हद्द संवेदनशील आहे. या हद्दीमध्ये गुन्हेगारी व गुन्हेगारी टोळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.

एवढेच नव्हे तर या हद्दीत गुंड, बँक माफिया, अंमली पदार्थ विक्रेते, विमल गुटखा विक्रेते, तसेच आंबट शौकीन (लॉज)मुलींकडून व्यवसाय करणारे, अशा अनेक गुन्हेगारीला वाव देणाऱ्या घटकांविरुद्ध एखाद्या वेळी पोलिस निरीक्षकांना गोपनीय माहिती मिळाली तर त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणाऱ्या सरकारी वाहनांचा दरवाजा बंद होत नसल्याने तो वाहन चालवत असताना अचानक उघडतो. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Bhusawal: A damaged vehicle of Market Police Station.
Jalgaon Crime News : गाणे बदलविल्याने तरुणावर चाकूने हल्ला

भुसावळ उपविभागात तालुका पोलिस ठाणे, शहर पोलिस ठाणे, बाजारपेठ पोलिस ठाणे, नशिराबाद पोलिस ठाणे असे चार पोलिस ठाणे आहेत.

यातील तीन पोलिस ठाण्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून नवीन सरकारी वाहन मिळाले असून, सर्वांत मोठी हद्द असणारे बाजारपेठ पोलिस ठाण्याकडे का दुर्लक्ष केले जात आहे. वाहनाचा पत्रा सडलेला आहे.

वाहनाचे चारही टायर कधी धोका देणार हे सांगणे कठीण आहे. कधी वाहन कुठे बंद पडेल, याचा भरोसा नाही. तसेच वाहनांचा दरवाजा कायम उघडा असतो, असे निष्क्रिय झालेले सरकारी वाहन कर्मचारी चालवत आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे नवीन वाहन उपलब्ध असल्यानंतरही न देण्यामागील गौडबंगाल काय आहे?

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bhusawal: A damaged vehicle of Market Police Station.
Dhule News : संचमान्यतेत आधारची अट तूर्त शिथिल; भाजप शिक्षक आघाडीच्या मागणीला यश

गुन्ह्यांचा तपास, पंचनाम्यासाठी कसरत

बाजारपेठ पोलिस ठाण्याला कर्मचाऱ्यांना गुन्ह्यातील संशयित आरोपींना रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करणे तसेच न्यायालयात हजर करणे, यानंतर लॉकअप (तुरूंगात)मध्ये टाकणे, अपघातस्थळी पोहोचणे, अशा अनेक घटना ठिकाणी, गुन्ह्याचा पंचनामा करण्यासाठी सर्व कसरत सरकारी वाहनांतूनच होत असते.

पोलिस अधीक्षकांनी तत्काळ बाजारपेठ पोलिस ठाण्याला नवीन सरकारी वाहन उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून एखादा अपघात घडण्याच्या आधी टाळता येईल.

Bhusawal: A damaged vehicle of Market Police Station.
Dhule Crime News : मुलीसोबतच्या भांडणामुळे जावयास बेदम मारहाण; सासरा-मेहुण्यांना जन्मठेप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.