चाळीसगाव ‘तहसील’मध्ये दलालांचा सुळसुळाट : आमदार मंगेश चव्हाण

mla mangesh chavan
mla mangesh chavanesakal
Updated on

जिवन चव्हाण : सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची सक्ती केल्यानंतर येथील तहसील कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, बहुतेक लाभार्थी ग्रामीण भागातील असल्याने त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही दलालांकडून आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावरून संतप्त झालेल्या आमदार मंगेश चव्हाण यांनी बुधवारी (ता. ६) थेट तहसील कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले व दलालांकडून होणारी आर्थिक लूट बंद करण्याबाबत तंबी दिली. यामुळे आमदार चव्हाण यांच्या ‘स्टिंग ऑपरेशन’च्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

तालुक्याला संजय गांधी निराधार, श्रावणबाळ सेवा व इंदिरा गांधी निराधार योजना आदी वरदान ठरलेल्या आहेत. या योजनेच्या विशेष सहाय्य निधीतून हजारो लोकांच्या घरात चुली पेटत आहे. दरम्यान, तालुक्यात एकूण ३१ हजार दोनशे लाभार्थी वरील योजनांचा लाभ घेत आहेत. त्यापैकी संजय गांधी निराधार योजनेचे ५ हजार पाचशे, श्रावणबाळ सेवा योजनेचे ८ हजार सातशे व इंदिरा गांधी निराधार योजनेचे १७ हजार लाभार्थी आहेत. दरम्यान, २० ऑगस्ट २०२० च्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यावर एप्रिल-जून महिन्यांत २१ हजारांचा उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या शाखेत जमा करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी येथील तहसील कार्यालयात येत आहे. मात्र कागदाच्या नावाखाली ज्येष्ठ लाभार्थ्यांची अक्षरश: आर्थिक लूट केली जात आहे.

mla mangesh chavan
दुरुस्तीच्या दुचाकींच्या सुट्या भागांची विक्री; गॅरेजचालकाचा 6 जणांना चुना

आमदारांकडून तंबी

विविध योजनांच्या लाभार्थ्यांकडून आर्थिक लूट केली जात असल्याची गंभीर स्वरूपाची बाब लक्षात आल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी बुधवारी (ता. ६) दुपारी तहसील कार्यालयावर धडक देत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली. दरम्यान, या ठिकाणी दलालांचा सुळसुळाट झाला असून, तहसील परिसरात असे दलाल आढळून आल्यास त्यांची गय केली जाणार नाही, अशी कडक सूचना आमदार चव्हाण यांनी यावेळी दिली. तसेच आपण ही जाचक अट रद्द करण्यासाठी शासनाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

mla mangesh chavan
Jalgaon : जवानाने पत्नीसह मुलांना काढले घराबाहेर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.