crime
crimeesakal

Jalgaon Crime News : क्षुल्लक कारणावरून पत्नीचा निर्घृण खून; संशयितास अटक

Published on

Jalgaon Crime News : क्षुल्लक कारणावरून लाकडी दांड्याने डोक्यात वार करून पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर धनवाडी रस्त्यावरील शेतात मंगळवारी (ता. १९) सकाळी आठच्या सुमारास घडली.

पोलिस अधिकारी, कर्मचारी, फाॕरेंसिक टिम व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले असून, मृत महिलेच्या पतीला संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(Brutally murdering his wife for trivial reason jalgaon crime news)

शहराजवळील धनवाडी रस्त्यावर कैलास सुकदेव पाटील (रा. आव्हाणे, ता. जि. जळगाव) यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात मध्य प्रदेशातील दाम्पत्य शेतमजूर म्हणून काम करतात. दरम्यान, मंगळवारी (ता. १९) सकाळी आठच्या सुमारास शेतमजूर रेखाबाई दुरसिंग बारेला (वय ४४, रा. पांजरिया, ता. वरला, जि. बडवाणी) (मध्यप्रदेश) व तिचा पती संशयित दुरसिंग टेटिया बारेला (रा. पांजरिया, ता. वरला, जि. बडवाणी) (मध्य प्रदेश) यांच्यामध्ये पैसे मागितल्याच्या कारणावरून भांडण झाले.

भांडण विकोपाला गेल्यानंतर संशयित दुरसिंग टेटिया बारेला याने संतापाच्या भरात पत्नी रेखाबाई बारेला हिला लाकडी दांड्याने डोक्यास, तोंडावर डाव्या हनुवटीवर, शरीराच्या वेगवेगळ्या भागावर बऱ्याच ठिकाणी मारहाण करून ठार मारले. संशयित घटनेनंतर तेथून लगेच पसार झाला. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित दुरसिंग टेट्या बारेला यास पोलिस कर्मचारी संतोष पारधी व विलेश सोनवणे यांनी शोध घेऊन ताब्यात घेतले आहे.

crime
Jalgaon Crime News : जातीवाचक शिवीगाळप्रकरणी पतीच्या वकिलाविरुद्ध गुन्हा; 5 संशयितांविरुद्ध तक्रार

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी (अमळनेर भाग) सुनील नंदवालकर, चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे, चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक घनशाम तांबे आदींनी भेट दिली.

त्याचप्रमाणे पोलिस कर्मचारी शेषराव तोरे, ज्ञानेश्वर जवागे, विलेश सोनवणे, संतोष पारधी, जितेंद्र सोनवणे, संदीप भोई, प्रकाश मथुरे, किरण गाडीलोहार आदींसह इतर शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रवीण मांडोळे, संदीप पाटील आदींसह फाॕरेंसिक टिम व श्वानपथक सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहेत.

crime
Jalgaon Crime News : धानवडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()