जळगाव : आकाशवाणी चौकात सुशोभीकरणाच्या नावाखाली तयार केलेले भलेमोठे सर्कल डोकेदुखी ठरत असताना आता इच्छादेवी चौकातही सुरू केलेल्या सर्कलच्या कामामुळे हा चौक धोकादायक बनला आहे. या चौकात वीजखांबांचे स्थलांतर केलेले नाही आणि चारही बाजूंना अतिक्रमण(Encroachment) ‘जैसे थे’ असूनही काम सुरू केल्यामुळे वाहतूक कोंडी(traffic jam) होत आहे.जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर आकाशवाणी चौक, इच्छादेवी व अजिंठा चौकात रोटरी सर्कलचे काम होत आहे. पैकी आकाशवाणी चौकातील सर्कलचे काम पूर्ण झाले असून, सध्या अजिंठा व इच्छादेवी चौकात काम सुरू आहे.
सर्कलमुळे अडचण मुळात इच्छादेवी चौक परिसर अत्यंत संवेदनशील भाग आहे. त्या चौकात सर्कलचे काम हाती घेण्याआधी चारही बाजूंचे अतिक्रमण पूर्ण काढणे व वीजखांबांचे स्थलांतर होणे गरजेचे होते. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या बाबींकडे दुर्लक्ष करत थेट सर्कलचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.लक्झरी बसचा ठिय्याविशेष म्हणजे या चौकातून मोठ्या ट्रॅव्हल्स बसचे आवागमन सुरू असते. या वाहनांना वळसा घेण्यासाठी मोठी जागा लागते, ती चौकात उपलब्ध नाही. त्यामुळे वाहन मागे-पुढे घेऊनच जागा करून घ्यावी लागते.
शिवाय या बस चौकातच साइडला उभ्या असतात. भरीस भर म्हणून भुसावळकडे जा-ये करणाऱ्या कालीपिली, रिक्षाही बेशिस्तपणे महामार्ग अडवून उभ्या असतात. त्यामुळे महामार्गावर चारही बाजूंनी वाहतूक कोंडी होत आहे.अपघाताचा धोकाया चौकात सिंधी कॉलनीकडून व समोरच्या डी- मार्टकडून येणाऱ्या लहान-मोठ्या वाहनांची प्रचंड वर्दळ आहे. शिवाय महामार्गाच्या दोन्ही बाजूंवरील अवजड वाहनांचीही गर्दी असते. अशा स्थितीत या सर्कलच्या कामामुळे अपघाताचाही धोका वाढला आहे.
चारही बाजूंना अतिक्रमण
विशेष म्हणजे या चौकातील चारही बाजूंना कच्चे व पक्के असे दोन्ही स्वरूपाचे अतिक्रमण आहे. ते न काढताच सर्कल आखून त्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे या चौकात चारही बाजूंनी येणाऱ्या वाहनांची प्रचंड कोंडी होते.(ichhadevi circle)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.