Jalgaon News : अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाची दुरवस्था; गूळ नदीच्या पुलावर मोठमोठे खड्डे

Burhanpur Ankleshwar state highway is in bad condition due to potholes jalgaon news
Burhanpur Ankleshwar state highway is in bad condition due to potholes jalgaon newsesakal
Updated on

Jalgaon News : बऱ्हाणपूर -अंकलेश्‍वर राज्य महामार्गाची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून, अडावद ते चोपडा दरम्यान गूळ नदीवरील पुलावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला खड्ड्यात पाणी साचले आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारक त्रस्त झाले असून, दुरुस्तीची मागणी केली जात आहे. (Burhanpur Ankleshwar state highway is in bad condition due to potholes jalgaon news)

बऱ्हाणपूर अंकलेश्वर राज्य महामार्गाची दुरवस्था झाली आहे. याबाबत मे महिन्यात चोपड्याच्या आमदार लता सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यां अडावद बसस्थानकाजवळ रास्ता रोको आंदोलन केले होते.

त्यावेळी वरिष्ठांनी सात दिवसांत रस्त्याची दुरुस्ती करू, असे लेखी आश्वासन दिले होते. खासदार रक्षा खडसे, आमदार लता सोनवणे यांच्या प्रयत्नाने बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या रस्त्याच्या डागडुजीसाठी ५१ कोटींचा निधी मंजूर झाला. रस्त्याची स्थिती अद्यापही ‘जैसे थे’ आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Burhanpur Ankleshwar state highway is in bad condition due to potholes jalgaon news
Gulabrao Patil : शिवसेना शिंदे गट घराघरांत पोचणार : गुलाबराव पाटील

धानोरा ते गलंगी, अडावद- वर्डी फाटा, माचला फाटा- चोपडा, अकुलखेडा - हातेड या दरम्यान रस्त्याची अवस्थाही बिकट आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची पूर्णपणे चाळणी झाली आहे/

गूळ नदीच्या पुलावर आजूबाजूला खड्डे पडले आहेत. वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. रोजचे लहान-मोठे अपघात होत आहेत. ऐन पावसाळ्यात साधी दुरुस्ती देखील झाली नाही. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ सुरू असते. तसेच या रस्त्यावरून अवजड वाहने जास्त वापरतात. त्यामुळे रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. वरिष्ठांनी त्वरित लक्ष देऊन या रस्त्याची डागडुगी करावी, अशी मागणी अडावद व चोपडा परिसरातील प्रवाशांनी केली आहे.

Burhanpur Ankleshwar state highway is in bad condition due to potholes jalgaon news
MLA Mangesh Chavan : अतिदुर्गम गुजरदरीला मिळणार सुविधा; आमदार चव्हाणांच्या प्रयत्नातून 70 लाखांचा निधी मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.