Jalgaon Accident News : पाचोरा- मोंढाळा रोडवर बस व ट्रकची समोरासमोर धडक

 bus and truck accident on on Pachora Mondhala road Jalgaon Accident News
bus and truck accident on on Pachora Mondhala road Jalgaon Accident Newsesakal
Updated on

Jalgaon Accident News : पाचोरा - मोंढाळा रस्त्यावर मौनगिरी साखर कारखान्यासमोर मंगळवार (ता. १८) सकाळी सव्वासहाच्या सुमारास बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन त्यात १३ विद्यार्थी व बसचालकासह २० जण जखमी झाल्याची घटना घडली.

अपघाताचे वृत्त कळताच विद्यार्थ्यांचे पालक, विविध शाळांमधील शिक्षक, संस्थाचालक, सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्था संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी ग्रामीण रुग्णालयात प्रचंड गर्दी केल्याने या रुग्णालयाला यात्रेचे स्वरूप आले. ( bus and truck accident on on Pachora Mondhala road Jalgaon Accident News)

सर्व जखमींवर ग्रामीण रूग्णालयात उपचार करून घरी पाठवण्यात आले. या अपघातामुळे पुन्हा एकदा खराब रस्त्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. पाचोरा आगाराची घोसला ते पाचोरा ही मुक्कामी बस (एमएच १४, बीटी १६१८) प्रवासी व विद्यार्थी घेऊन पाचोऱ्याकडे येत असताना पाचोरा शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर सकाळी सव्वासहाच्या सुमारास समोरून येणाऱ्या ट्रकवर (क्रमांक : एमएच १९ सीवाय ७५२१) वर समोरासमोर धडकली.

अरुंद व खराब रस्ते असल्याने बस व ट्रकचा वेग कमी असल्याने अनर्थ टळला. या बसने वाडी, शेवाळे, सातगाव डोंगरी, सातगाव तांडा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने पाचोरा येथे ये-जा करीत करतात. १३ विद्यार्थी, ७ प्रवासी असे २० प्रवासी या बसमध्ये होते. बस व ट्रक अपघाताचे वृत्त शहरासह तालुक्यात पसरल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालक, कमालीचे भयभीत झाले व त्यांनी लगबगीने अपघात स्थळ गाठले.

तसेच शैक्षणिक संस्थांचे चालक, विविध शाळातील शिक्षक, सेवाभावी संस्था संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांनीही घटनास्थळी व नंतर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतल्याने प्रचंड गर्दी व गोंगाट झाला. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उशिरा आल्याने अनेकांनी संतप्त भावना ही व्यक्त केल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 bus and truck accident on on Pachora Mondhala road Jalgaon Accident News
Nandurbar Accident News : वाढदिवसाच्या दिवशीच द्यावा लागला अखेरचा निरोप; मोटारसायकल व कार अपघातात मृत्यू

सर्व विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. पीटीसी संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी दोन विद्यार्थिनींना सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्या तपासण्या व उपचार केले. चार तासाच्या उपचारानंतर सर्व विद्यार्थी व प्रवासी यांना घरी पाठवण्यात आले. बसचालक श्री. बडगुजर यांच्याही छाती व पोटाला मार लागल्याने त्यांच्यावरही उपचार झाले.

ग्रामीण रुग्णालयात पीटीसी संस्थेचे चेअरमन संजय वाघ, संचालक सतीश चौधरी, वासुदेव महाजन, मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, नगरसेवक विकास पाटील, एन. आर. पाटील, अंजली गोहिल, आर. एल. पाटील, प्रमोद पाटील, मराठा सेवा संघाचे सुनील पाटील, एम. एम. महाविद्यालयाचे सतीश देशमुख, गिरणाई संस्थेचे पंडित शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना व पालकांना धीर दिला. विद्यार्थ्यांना केळी व बिस्किटे देण्यात आली.

जखमी विद्यार्थी असे

स्वराज पाटील, विवेक राठोड, गोपाल चव्हाण, नीता राठोड, रोशन परदेशी, सुमीत नलवाडे, दीपक पवार, जतीन महाले, पूजा मनगटे, प्रतिभा राठोड, रोशनी चव्हाण, ज्योती चव्हाण, पुष्कर पाटील, दिनेश राठोड व दिनेश चव्हाण.

 bus and truck accident on on Pachora Mondhala road Jalgaon Accident News
Jalgaon Accident News: सेंधव्यात कारचा टायर फुटून तरुण ठार; 6 जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.