Jalgaon : अजिंठा लेणीतील बससेवा सोमवारी बंद; हजारो पर्यटकांचा हिरमोड; प्रशासनाविरोधात रोष

Ajanta Caves Tourists waiting for a bus at the parking lot
Ajanta Caves Tourists waiting for a bus at the parking lotesakal
Updated on

तोंडापूर (ता. जामनेर) : अजिंठा लेणी सोमवारी बंद असली तर लेणी बाहेरून पाहण्यासाठी सुरू असलेल्या बसेस बंद करून परिसरातही प्रवेश बंद केल्याने हजारो पर्यटकांचा हिरमोड झाला. त्यांना आल्यापावली परत जावे लागले. पर्यटकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.

अजिंठा लेणी प्रत्येक सोमवारी आतील देखभालीसाठी बंद असते. ही बंदी फक्त लेणीतच आहे. काही पर्यटक सोमवारी आले तरी त्यांच्यासाठी येथे एक बस ठेवण्यात येते व पर्यटकांना लेणी परिसरात घेऊन जाते. येथे पर्यटक लेणी बाहेरून बघून सातकुंड, व्ह्यू पॉइंट व गार्डन परिसर फिरून येत असतात. हे कित्येक वर्षांपासून सुरू आहे व आजवर कुणीही पर्यटकांना सोमवारी प्रवेशबंदी घातली नाही.(Bus service to Ajanta Caves closed on Monday Crowd of thousands of tourists Rage against administration Jalgaon News)

Ajanta Caves Tourists waiting for a bus at the parking lot
Kirankumar Bakale Controversy : बकाले अद्याप अटकेपासून दूरच; महाजनच्या अटपुर्वजामिनावर युक्तिवाद पूर्ण

आता दिवाळीच्या सुटीनिमित्त पर्यटक मोठ्या संख्येने अजिंठा लेण्यांना भेट देत आहेत. सोमवारी (३१ ऑक्टोबर) लेणी पाहण्यासाठी हजारो पर्यटक आले होते. मात्र या पर्यटकांना आत जाण्यास बंदी घालण्यात आली व बसही बंद करण्यात आली होती. यामुळे आलेल्या पर्यटकांनी काही काळ मेन गेटवर गोंधळ घातला होता. यासंदर्भात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पोलिसांकडून आहे.

सूचना आल्यामुळे प्रवेश बंद करण्यात आला, तर एसटी महामंडळाच्या आगारप्रमुखांना विचारले असता भारतीय पुरातत्त्व विभागाने पर्यटक आता आणू नका, असे सांगितल्याने बस बंद केल्या, तर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता आमचा काही संबंध नाही, ती जबाबदारी संबंधित विभागाची आहे, असे उत्तर त्यांनी दिले.

Ajanta Caves Tourists waiting for a bus at the parking lot
SP Instructions to officers : Basic Policingवर लक्ष द्या पण, सामान्य माणसाला त्रास नको

सर्वांनी उडवाउडवीची आणि एकमेकांवर जबाबदार ढकलल्याने हजारो पर्यटकांना याचा फटका बसला. प्रवासीही नाराज झाले. दिवाळीच्या सुटी असल्याने अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

अजिंठ्याच्या पायथ्याशी ‘ठिय्या’

अजिंठा लेणी व्हिजिटर प्रवेशद्वार टी पाइंट येथे अजिंठा जनविकास संघर्ष समितीने बेमुदत ठिय्या आंदोलनाला मंगळवारपासून (ता. १) सुरवात केली आहे. अजिंठा लेणी परिसरातील नागरिकांना रोजगार मिळावा, अजिंठा व्हिजिटर सेंटर (अभ्यागत केंद्र) मध्ये ठेवलेल्या गौतम बुद्धांची मूर्ती व बौद्ध भिक्कू मूर्ती यांची निंदा थांबून तत्काळ अभ्यागत केंद्र कायमस्वरूपी सुरू करावे, लेणी पाहण्यासाठी आलेल्या बौद्ध भिक्कू यांना एमटीडीसीने कोणतेही शुल्क न आकारता प्रवेश देण्यात यावा, लेणीतील एमटीडीसी हॉटेलमधील दारूविक्री बंद करावी आदी मागण्या आहेत. यासाठी अजिंठा संघर्ष समिती अध्यक्ष कामराज तायडे, उपाध्यक्ष शेख इसा सचिव शेख अजीम यांच्यासह समिती सदस्य व बेमुदत ठिय्या आंदोलनात बसले आहे.

Ajanta Caves Tourists waiting for a bus at the parking lot
Jalgaon : 7 महिन्यांपासून बंद विमानसेवेबाबत लवकरच दिल्लीत बैठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.