Jalgaon News : खादी ग्रामोद्योगचा बसस्टॉप या ठिकाणी हलविणार; टॉवर चौकातील गर्दी टाळणार

Vehicles parked on the road in front of the Khadi village industry.
Vehicles parked on the road in front of the Khadi village industry.esakal
Updated on

Jalgaon News : खादी ग्रामोद्योगजवळ असलेला एसटी बस व खासगी वाहनांचा स्टॉप शिवाजीनगर भागाकडे हलविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली.

टॉवर चौकातही गर्दी

शिवाजीनगर पूल उतरल्यानंतर टॉवर चौकात हॉटेल आर्या व खादी ग्रामोद्योग भवनाजवळ खासगी वाहन व एसटी बस स्टॉप झाला आहे. स्टॉपवर ग्रामीण भागात जाणारी वाहने उभी असतात, तसेच रिक्षा स्टॉपही त्याच ठिकाणी आहे. (bus stop of Khadi village industry will be shifted to Shivajinagar jalgaon news)

त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी होते. एसटी प्रवासी घेण्यासाठी व उतरण्यासाठी थांबल्यावर तेथे वाहनांचीही कोंडी होते. टॉवर चौकातही गर्दी होऊन वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे अपघात होण्याचाही धोका आहे.

शिवाजीनगरकडे स्टॉप करणार

खादी ग्रामोद्योग जवळ होणारी गर्दी टाळण्यासाठी हा स्टॉप बदलण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. महापालिका प्रशासनानेही त्याची पाहणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vehicles parked on the road in front of the Khadi village industry.
Jalgaon News : 63 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी 'इतकी' रक्कम मंजूर

या स्टॉपमुळे गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्याने आता हा स्टॉप बंद करून तो शिवाजीनगर भागाकडे करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सांगितले. शिवाजीनगर भागाकडे हा स्टॉप करण्यात येईल. त्या ठिकाणी खासगी वाहने व एसटीचा स्टॉपही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"शहरातील अतिक्रमण, व रस्त्यांवरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी महापालिकेतर्फे उपाययोजना करण्यात येत आहे. आता लवकर सम-विषम तारखांना रस्त्यावर पार्किंग सुविधा करण्यात येईल." -डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, महापालिका, जळगाव

Vehicles parked on the road in front of the Khadi village industry.
Ashadhi Ekadashi Bakri Eid : बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा निर्णय; पारोळा येथील मुस्लिम बांधवांचे कौतुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.