Jalgaon Bypoll Election : 82 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर

Bypoll elections of 82 gram panchayats announced
Bypoll elections of 82 gram panchayats announcedesakal
Updated on

Jalgaon Bypoll Election : जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतींमधील ९७ सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. २५ एप्रिल ते २ मेदरम्यान उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती होणार आहे. (Bypoll elections of 82 gram panchayats announced jalgaon news)

३ मेस अर्जांची छाननी, तर ८ मेपर्यंत माघार घेता येणार आहे. १८ मेस मतदान, तर १९ मेस मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतींमधील एका सरपंचासह ९७ सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जिल्ह्यात आगामी काळात १६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Bypoll elections of 82 gram panchayats announced
Eknath Khadse : अजित पवार आवडीचे, त्यामुळे मीडिया ट्रायल : एकनाथ खडसे

महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, ग्रामपंचायत विभागाच्या नायब तहसीलदार दीपाली काळे आदींनी ग्रामपंचायतींची प्रभागरचना आयुक्तांसमोर सादर केली.

तत्पूर्वी ३४ ग्रामपंचायतींमधील हरकतींवर संबंधित प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या निवाड्यांचीही माहिती देण्यात आली. त्यानुसार आयुक्त कार्यालयाने या प्रभागरचनेला अंतिम मंजुरी दिली आहे. २५ एप्रिलला प्रभागरचना प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे.

Bypoll elections of 82 gram panchayats announced
National Banana Day 2023 : ..तर केळी उत्पादनातील नेतृत्व पश्चिम महाराष्ट्राकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.