Jalgaon : बिबट्याच्या हल्ल्यात वासरू मृत्युमुखी; दहशतीने शेतात चोरीच्या प्रमाणात वाढ

Leopard Attack
Leopard Attackesakal
Updated on

लोहारा (ता. पाचोरा) : येथील नाचनखेडा रस्त्यावरील कासमपुरा शिवारात गेल्या २० ते २५ दिवसांपासून बिबट्याने दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. याबाबत वनविभागाकडे वारंवार तक्रार करूनही कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त केल्या जात नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

दरम्यान, येथील शेतशिवारात संतोष बळिराम सूर्यवंशी (डामरे) यांच्या शेतात बिबट्याने वासरांचा फडशा पाडला आहे. तर दुसरीकडे दहशतीमुळे शेतकरी शेतात जाणे टाळत असल्याने याचा फायदा चोरटे घेत असून, ठिबकच्या नळ्या, पाण्याच्या मोटारी आदी साहित्य चोरीला जात आहे.

कासमपुरा शिवारातील शेतकरी संतोष बळिराम सूर्यवंशी यांनी वन विभागाचे कर्मचारी ललित पाटील यांना बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाल्याचे कळविले. (Calf dies in leopard attack Increase in farm theft due to terror Jalgaon News)

Leopard Attack
Jalgaon Crime Update : भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मात्र, त्यांनी मृत वासराचे ऑनलाइन फोटो मागवून प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले. बिबट्याच्या दहशतीने लोहारा परिसरातील शेतकरी भयावह झाले असून, बिबट्याच्या हल्ल्यानंतर देखील वनविभाग अजूनही बिबट्याला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते.

गेल्या २५ दिवसांपासून लोहारा- नाचनखेडा रस्त्याच्या परिसरातील शेतात बिबट्या अनेक वेळा शेतकरी बांधवांना दिसला आहे. या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी देखील करण्यात आली. मात्र अद्यापही मागणी पूर्ण झालेली नाही. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. शेतकरी बांधव रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन शेतात जात आहेत.

साहित्य चोरीला

बिबट्याच्या दहशतीने परिसरातील शेतकऱ्याचे शेतातील गोदामातून कापूस, विहिरीतून मोटार, वायर, पाइप व इतर वस्तूंचे चोरीचे प्रमाण वाढत आहे. याबाबत देखील पोलिस प्रशासनास तक्रार करण्यात आली आहे. याकडेही पोलिस दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे परिसरातील सर्व शेतकरी चिंतेत आहेत. बिबट्याचा बंदोबस्त झाल्यानंतर चोरी झालेल्या वस्तूचा तपास लावण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून मागणी होत आहे.

Leopard Attack
jalgaon : भुसावळातील 5 जण जिल्ह्यातून ‘हद्दपार’; आणखी उपद्रवींवर होणार कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.